Kalyan Crime News: कल्याण हादरलं! तरुणाकडून अल्पवयीन मुलीची सपासप वार करत हत्या

तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam tv
Published On

अभिजीत देशमुख

Kalyan Crime News: कल्याणमधून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. कल्याणमध्ये एका तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाली आहे. कल्याणच्या तिसगाव परिसरातील ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये २० वर्षीय आदित्य नावाच्या तरुणाने १२ वर्षीय मुलीवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या तरुणाने अल्पवयीन मुलीवर या तरुणाने अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने सात ते आठ वार केले. या हल्ल्यात या मुलीचा मृत्यू झाला आहे.

Kalyan Crime News
Washim Crime News : महात्मा फुले चौकात राडा, गावठी कट्ट्यांमधून तीन राऊंड फायर; पाेलिस तपास सुरु

या तरुणाने भयंकर कृत्य केल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी या तरुणाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. आदित्य असे या तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यानंतर या तरुणाने देखील फिनेल प्यायलं. आरोपीला देखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तत्पूर्वी, हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, हा तरुण काही दिवसांपासून या मुलीचा पाठलाग करत असल्याची माहिती आजूबाजूच्या नागरिकांनी दिली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.

नेमकं काय घडलं?

बारा वर्षे अल्पवयीन मुलगी आपल्या आईसोबत घरी जात होती. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या आवारात पोहोचली. पायऱ्या चढत असताना एका तरुणाने या मुलीवर चाकूने हल्ला केला. तरुणाने तिच्यावर सहा ते सात वेळा चाकूने हल्ला केला.

या हल्ल्यात अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हल्ला करून हल्लेखोर पळून जात असताना नागरिकांनी त्याला पकडलं. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

Kalyan Crime News
Maharashtra Crime News: मुंबईसह नाशिक, अहमदनगरमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; ६ जणांना अटक, महाराष्ट्रात चाललंय तरी काय?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्व परिसरात भररस्त्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. दोन विविध ठिकाणी काही तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता.

कल्याणमध्ये पोलिसांचा धाक राहिलाय की नाही?

गेल्या दहा दिवसात या घटना घडल्याने कल्याण पूर्व परिसरात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा उडाले आहेत. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये पोलिसांचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com