Unique Offer: महिनाभर फोनला हात लावू नका अन् लाखोंचे बक्षीस जिंका; या कंपनीची हटके ऑफर

Unique Competition By Company: जगभरात अनेक स्पर्धा होतात. धावणे, डान्स, गाण्याच्या स्पर्धा तर सर्वांनी ऐकल्याच असतील. अनेकदा तर जास्त वेळ झोपण्याची, खाण्याच्यादेखील स्पर्धा होता. अशीच एक आगळीवेगळी स्पर्धा एका कंपनीने आयोजित केली आहे.
Dont use smartphone for one month
Dont use smartphone for one monthGoogle
Published On

Unique Offer By Company Of Don't Use Mobile Win Prize Of 8 Lakh:

जगभरात अनेक स्पर्धा होतात. धावणे, डान्स, गाण्याच्या स्पर्धा तर सर्वांनी ऐकल्याच असतील. अनेकदा तर जास्त वेळ झोपण्याची, खाण्याच्यादेखील स्पर्धा होता. अनेकजण टाइम लावून सर्वात जास्त कोण जास्त अन्न खाणार अशीही स्पर्धा असते. अशीच एक आगळीवेगळी स्पर्धा एका कंपनीने आयोजित केली आहे. महिनाभर मोबाईलपासून लांब राहिल्यास कंपनी लाखो रुपयांचे बक्षीस देणार आहे. (Latest News)

एका दही उत्पादक कंपनीतर्फे ही योजना आयोजित करण्यात आली आहे. ज्यात स्पर्धकांना महिनाभर मोबाईलपासून दूर राहायचे आहे. मोबाईलपासून लांब राहिल्यास विजेत्या स्पर्धकाला ८ लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे.

सिग्गी ब्रँडने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. हा एक आइसलँडिक दही ब्रँड आहे. कंपनीच्या या स्पर्धेचे नाव डिजिटल डिटॉक्स प्रोग्राम आहे. या स्पर्धेत महिनाभर मोबाईलला हात लावायचा नाहीये. यामध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांना आपला स्मार्टफोन एका बॉक्समध्ये ठेवावा लागेल. एक महिना हा फोन वापरता येणार नाहीये. या स्पर्धेतून १० विजेते निवडले जाणार आहे.

Dont use smartphone for one month
Viral Video: अरेरे! खिडकीच्या बाहेर हवा खाण्यासाठी मान डोकवली अन् ; VIDEO एकदा बघाच...

या स्पर्धेत विजेत्यांना कंपनीतर्फे १००० डॉलर म्हणजे ८ लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. विजेत्याला कंपनीतर्फे प्रीपेड सिम कार्डसह एक रेट्रो फ्लिप फोन तीन महिन्यांसाठी मोफत देण्यात येईल. या स्पर्धेसाठी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करावे लागतील. सिग्गी कंपनीच्या वेबसाइटवर स्पर्धेची माहिती देण्यात आली आहे.

Dont use smartphone for one month
Accident Shocking CCTV Footage: हैदराबादमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार २० फूट अंतरावर उडून पडला; VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com