
Crocodile Attack Video: सोशल मीडियावर नुकताच एक धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुणी नदीत उतरून मासे पकडण्याचा प्रयत्न करत असते. पण अचानक एक मगर तिच्यावर झडप घालते. काही क्षणांतच परिस्थिती इतकी गंभीर होते की मगरीने तिचा हातच कुरतडला. हा थरारक व्हिडिओ पाहणाऱ्यांची झोप उडाली आहे.
घडलेल्या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तिथे असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये (Mobile) शूट केला होता. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतं की, तरुणी पाण्यात उभी आहे आणि अचानक तिच्या उजव्या हातावर मगर झडप घालते. त्यानंत तरुणी वेदनेने किंचाळते. नशीब म्हणजे तिथेच उपस्थित असलेल्या लोकांच्या मदतीमुळे तिला मगरीच्या तावडीतून सोडवण्यात यश येते. काही सेकंदांचा हा व्हिडिओ अक्षरशः अंगावर काटा आणणारा आहे.
ही घटना नेमकी कुठली आहे ते अद्याप समजले नाही. पण हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील nexus_study या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे शिवाय फेसबूक, ट्विटर(एक्स) या माध्यमांवरही शेअर करण्यात येत आहे. या घटनेनंतर प्रत्येक नागरिकाने नदी असो तलाव आणि जलाशयाजवळ जाताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
या व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी तरुणीच्या बेजबाबदार वागणुकीवर टीका केली आहे. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''खुप धक्कादायक प्रसंग होता'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''नशीब वाचली'' तर काहींनी म्हटलं आहे,''या घटनेतून काही तरी शिका आणि पाण्यात उतरताना काळजी घ्या'' अशा प्रकारच्या बऱ्याच प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.