Viral Video: स्कूल बसचा ब्रेक फेल, ट्रॅफिक सिग्नलवर दिसेल त्याला चिरडलं; घटना सीसीटीव्हीत कैद

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्की हादरुन जाल. नक्की व्हायरल व्हिडिओत नेमके काय आहे ते एकदा व्हिडिओ पाहा.
Shocking Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Bhopal Accident Video: शहराच्या एका मध्यवर्ती भागात भीषण अपघाताची घटना घडली आहे. ज्यात एक स्कुल बसचा ब्रेक फेल झाला आणि अनियंत्रित झालेल्या बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार टक्कर मारली. या भीषण अपघातात अनेक जण जखमी झाले, तर काहींचा जागीच मृत्यू झाला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

घटना सीसीटीव्ही कैद

व्हायरल(Viral News) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला सिग्नलवर अनेक वाहन उभी असलेली दिसत आहेत. अचानक त्याच रस्त्यावर एक जोरदार वेगात एक स्कूल बस येते आणि उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक मारते. हा अपघात इकता जोरदार होता की, काहीजणांचा यात मृत्यू झालेला आहे. तात्काळ परिसरातील नागरिकांची गर्दी अपघातास्थळी जमते.

ही घटना परिसरातील एका सीसीटीव्ही(Cctv Video) कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. सर्व अपघात हा भोपाळ शहरातील असल्याचे समोर आलेले आहे. नेमकी कधी आणि भोपाळमधील कोणत्या भागात घडली याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेला आहे.

nltvnew या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे. काही तासातच अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''वारंवार अशा अनेक घटना पाहण्यासाठी मिळतात'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''खुप वाईट झालं'' तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''कोणावर गुन्हा दाखल झाला की नाही'' अशा प्रकारे समिश्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Viral Video
Viral Video: दुर्दैवी घटना! घरासमोर पावसात खेळणाऱ्या चिमुकल्याचा खड्ड्यात पडून मृत्यू; हृदयद्रावक व्हिडिओ आला समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com