Shocking Video: कारचा भयंकर अपघात! १२ सेकंदात १५ वेळा उलटली, तिघांचा मृत्यू

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या एका भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ कर्नाटकातील आहे. अपघात इतका भीषण आहे की प्रत्येकजण हैराण झालेला आहे.
Viral Video
Shocking VideoSaam Tv
Published On

Car Accident karnataka: कर्नाटक राज्यातील महामार्गवर एक भयंकर अपघात झाला आहे. गाडीचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायडरला धडकून अवघ्या १२ सेकंदात १५ वेळा उलटली जाते. यात तिघांचा मृत्यू झाला. महामार्गावरील संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अचानक हायवेवर एक कार तब्बल १५ वेळा उलटली जाते. कार उलटली जात असताना त्या वाहनातून एक व्यक्ती हवेत उडाला जातो आणि जमिनीवर जोरदार पडतो. ही घटना इतकी भीषण असते की रस्त्याच्या बाजूला असलेले नागरिक तात्काळ त्यांची मदत करण्यासाठी धावून जातात. अवघ्या १२ सेंकंदात थरारक घटना घडली जाते.

घडलेला सर्व अपघात हा कार हायवेवरील डिव्हायडरला धडकून झालेला आहे. या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झालेला आहे, ज्यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. हा अपघात कर्नाटकातील एनएच- १५०A महामार्गावर चल्लाकेरे आणि बळ्ळारी दरम्यान झालेला आहे.

सध्या संपूर्ण थरराक अपघाताचा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावरही व्हायरल झालेला आहे. पंरतू तो एक्सवरील @Madrassan_Pinky या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर यापूर्वीही अनेक धक्कादायक अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालेले आहेत.

टीप: हा धक्कादायक अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

Viral Video
Pune Car Accident Video: पुण्यात चाललंय काय?, भरधाव कारने एकाला चिरडले; अपघात CCTV मध्ये कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com