Shocking Video: काही दिवसांपूर्वी झाले लव्ह मॅरेज; नवऱ्यासमोरच पत्नीचे अपहरण, व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल

Kidnapping Incident: सोशल मीडियावर एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. जी व्हायरल घटना एक अपहरणाची आहे. नक्की घटना कशी घडते ते पाहून प्रत्येजण हैराण झालेला आहे.
Kidnapping Incident
Shocking VideoSaam Tv
Published On

Rajasthan Shocking Video: सध्याच्या काळात लव्ह मॅरेजच्या घटना खूप चर्चेचा विषय बनतात. अनेकदा या विवाहानंतर काही घटना एक वेगळे वळण घेतात आणि सर्वांना हैराण करुन सोडतात. सध्या याच संदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेली घटना जयपूरमधील पावटा येथील आहे. जिथे घरातून एक महिलेला तिच्या नवऱ्यासमोरुन काही लोकांनी अपहरण करुन नेले. व्हिडिओतही दिसते की, एका घराबाहेर एक गाडी वाहन उभे आहे आणि काही वेळात काही व्यक्ती एका महिलेले पकडून गाडीत घेऊन जातात. महिला त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करते. पण तिला ते वाहनात पकडून घेऊन जातात.

संपूर्ण घटना घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लव्ह मॅरेज केल्याचा राग मनात ठेवून हे अपहरण झाल्याची माहिती मिळेत. पण साम टीव्ही याची पुष्टी करत नाही. सध्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अपहरणाचा व्हिडिओ(Video) इन्स्टाग्राम आणि फेसबूक आणि अन्य सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे आणि त्यावर लोकांनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. एका यूजरने कमेंट केली,''भारतात आता धक्कादायक घटना वाढल्या आहेत'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''अन्य परिसरातील लोकांनी एकत्र येऊन वाचवता आले असते'' अशा संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Kidnapping Incident
Shocking Video: मित्रांसोबत मजा करायला गेला, पण परतलाच नाही! राफ्टिंग करताना नदीत बुडून युवकाचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com