Viral Video: पार्किंगवरून वाद! २०-२५ जणांनी दोन तरुणांना बेदम मारले; VIDEO व्हायरल

Fighting Video: सोशल मीडियावर सध्या दुचाकी पार्कींग करण्याच्या वादातून मोठी हाणामारी झालेली आहे. नक्की व्हायरल होत असलेली घटना कुठली आणि घटनेत पुढे काय घडले ते एकदा व्हिडिओत पहा.
Fighting Video
Viral VideoSaam Tv
Published On

संजय गडदे, साम टिव्ही.

Mumbai News: रस्त्याच्याकडेला दुचाकी पार्कींग करण्याच्या वादातून सहा ते आठ तरुणांच्या जमावाकडून दोन तरुणांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमाराला ही घटना अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा यारी रोड परिसरात घडली. याप्रकरणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वेळीच घटनास्थळावर पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण याप्रकरणी दोन्हीही गटाने एकमेका विरोधात तक्रार दिल्यामुळे दोन्ही बाजूच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरच्या रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अंधेरी चार बंगला कामगार (Worker) नगर परिसरात राहणारे आदित्य रवींद्रनाथ श्रीवास्तव आणि कुणाल शुक्ला यांनी त्यांची दुहाकी यारी रोड परिसरातील जोहरा आघाडी इमारतीसमोर उभी करून तिथे गप्पा मारत उभे होते.

इतक्यात तिथे आलेल्या अनोळखी तरुणाने दुचाकी बाजूला काढण्यास सांगितले. यावर पाच मिनिटात आम्ही येतो जाणार आहोत असे अनोळखी व्यक्तीला सांगितले मात्र अनोळखी व्यक्तीने ऐकून न घेता शिवीगाळ करून आपल्या इतर सहकाऱ्यांना बोलावून आदित्य आणि कुणाल या दोघा तरुणांना मारहाण करून पाहून घेण्याची धमकी दिली.

दरम्यान ही मारामारी सुरू असतानाच त्याच परिसरात असलेल्या मस्जिद समोरील बंदोबस्तावरील पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन त्यांच्यातील वाद मिटवला यामुळे मोठा अनर्थ टळला पोलिसांनी दोन्ही बाजूच्या तरुणांना गाडीत बसवून वर्सोवा पोलीस ठाण्यात आणले.

यानंतर मारहाण झालेल्या तरुणांच्या तक्रारीवरून सलीम अब्दुल गफार शेख (६३ वर्ष ) आणि २ अनोळखी तरुणांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली. तसेच सलीम शेख यांच्या तक्रारीवरुन श्रीवास्तव यांच्या विरूद्ध क्रॉस तक्रार घेण्यात आकी आहे

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Fighting Video
Viral Video: चूक कुणाची? आधी तू तू मैं मैं... तिने चपलेने मारले, त्याने चपराक लगावली, पहा व्हायरल व्हिडीओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com