
Young Boy Video: 'पुणे तिथे काय उणे' हे असे आपल्या कानावर पडताच तुम्हाला पुण्यातील विविध गोष्टी डोळ्यासमोर येत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला त्यासंबंधित अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात मात्र या व्हिडिओत जास्त प्रमाण तरुणाईचे असल्याते दिसून येते. सध्या पुण्यातील अशाच दोन तरुणांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात ते बांधकाम सुरु असलेल्या उड्डाण पुलावर रिल्स बनवत आहेत.
व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ एका व्यक्तीने रस्त्यावरुन मोबाईलमध्ये कैद केला आहे, ज्यात अगदी लांबवर तुम्हाला दोन तरुण एका बांधकाम सुरु असलेल्या पुलावर थांबलेले दिसत आहेत मात्र ते त्यावर उभं राहून फोटो शुट करत आहेत. व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला व्हिडिओत असलेला धोका दिसून येईल. सध्या वाऱ्याच्या वेगाने तरुणांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पुण्यातील व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ ''@vasantmore88'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये यूजरने लिहिले आहे,''आज सकाळी घरून होळकर गार्डनच्या ऑफिसला निघालो असता अचानक पुलावरचे दृष्य पाहून मला धक्काच बसला, कारण कात्रज चौकातील प्रस्तावित धर्मरक्षक छत्रपती श्री. संभाजी महाराज उड्डाण पुलावर सुरक्षेचे तीन तेरा नऊ बारा वाजवले जात होते'', असे लिहिले आहे.
सध्या पुण्यातील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''कारवाई झाली पाहिजे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''रील बनवायचा आदर्श तुमच्या कडून घेतलेला दिसतोय'', शिवाय अनेकांनीही संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
टीप : पुणे शहरातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.