योगेश गायकवाड- साम टिव्ही
पावसाळ्यात सापांची भीती खूप असते. शेत शिवारात, जंगलात, डोंगरदऱ्यात तुम्ही साप पाहिला असेल. पण पायात घालणाऱ्या बूटात साप आढळलाय. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये कोणत्याही ठिकाणाहून साप बाहेर येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एका माणसाच्या पॅन्टमध्ये साप दिसत होता. आता चक्क एका लेटीज बूटाच्या आत साप सापडला आहे.
बुटाच्या आत सापडला साप
साप निवांत त्या बुटात बसला होता. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ (Video)व्हायरल होतो. एका महिलेच्या बूटात साप अढळलाय. एक व्यक्ती काठीने त्या सापाला बाहेर काढण्याचं प्रयत्न करत आहे. तेवढ्यात तो साप आतून फणा काढतो असा व्हिडीओ व्हायरंल होतोय.
हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @mrbeen979619 नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कुठालचा आहे हे कळलं नाही. पण पावसाळ्यात(monsoon-season) घराबाहेर जातांना सावधागिरी बाळगा. बुट घालतांना निट बघा तुमच्या बूटात साप नाही ना. कमीत कमी दोन वेळा तरी खात्री करा. लहान मुलांची काळी घ्या. शाळकरी मुलांनी सतर्क करा.
सोशल मीडियावर याआधीही सापांचे अनेक व्हिडिओ व्हायरल(Vira) झाले आहेत. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया केल्या आहेत. त्यातील पहिल्या यूजरने लिहिले आहे की, 'असे प्रकार सातत्याने होताना दिसून येत आहेत' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की' कायम सावधगिरीने राहायला पाहिजे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.