देशभरात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या, दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. नुकताच राजस्थानमध्ये नैऋत्य मान्सून दाखल झाला आहे. यामुळे सोसायट्याच्या वाऱ्यासह धो-धो पाऊस पडत आहे. याच पावसात एका कारवर चक्क लोखंडी खांब पडला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओत एका कारवर विजेचा लोखंडी खांब पडला आहे. त्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले आहे. या व्हिडिओत रस्त्यावर अनेक कार दिसत आहे. सोसायट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होताना दिसत आहे. या व्हिडिओत दोन कारचालक आपली कार घेऊन जाताना दिसत आहे. त्यातील पांढरी कार एका ठिकाणी उभी राहते. त्याच्याच बाजूला एक लाल रंगाची कार थांबते.
याच कारवर विजेचा लोखंडी खांब जोरात पडतो. हा खांब पडताच एका सेंकदासाठी काय झाले हे कोणाच्याच लक्षात आले नाही. या अपघातात लाल रंगाच्या कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही घटना झाल्यानंतर आपला प्राण वाचवण्यासाठी पांढऱ्या रंगाच्या कारमधील माणूस उचलून एका शेडखाली आश्रय घ्यायला जातो. या अपघातात मागून येणारा एका स्कूटरचालकदेखील वाचला आहे. नाहीतर मोठा अनर्थ घडला असता.
Jist.news या सोशल मिडिया अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मंगळवारी राजस्थानच्या गंगानगरमध्ये हाय व्होल्टेज पॉवर लाइन पोल एका कारवर पडला. सुदैवानी सर्व प्रवासी सुखरुप आहेत, असं कॅप्शन देण्यात आले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यात प्रशासनाची चूक आहे, असं अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.