Viral Video: बापरे! भररस्त्यात ९ फूट लांबीचा अजगर, वाहन चालकांची तारांबळ उडाली, थरारक VIDEO

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक सापाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की काय घडलं असेल व्हिडिओत ते तुम्ही पाहा.
Shocking Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Viral Video:सोशल मिडियावर आपल्याला कायम अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झालेले पहिले आहेत. मग अनेकदा या व्हायरल व्हिडिओत कधी थरारक अपघातांचे व्हिडिओ असतात मग कधी अनेक प्रकारचे भितिदायक व्हिडिओ . मात्र सोशल मिडियावर सध्या भर रस्ताच्या मधोमध भला मोठा अजगर दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक रस्ता दिसून येत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत . मात्र वाहनांच्या रांगा च्या मधोमध तुम्ही पाहिले तर भला मोठा अजगर रस्त्या वर अलेला दिसून येत आहे . त्यामुळे वाहन चालक रस्त्याच्या दोन्ही बाजुला थांबलेले आहेत. व्हिडिओमध्ये(VIDEO) नंतर पाहिले तर दिसेल की काही व्यक्ती सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद करत आहेत

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर सध्या पाहिला जात असून तो इन्स्टाग्रामवरील '@adultsociety' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत नक्की घटना कुठल्या शहरातील आहे हे सांगितले आहे. ज्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,''रविवारी मुसळधार पावसाने डेहराडून जिल्ह्यात जलमय झाल्याने हा साप दिसला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या मधोमध 8 ते 9 फुटांचा अजगर रेंगाळताना दिसत आहे. 1.15 मिनिटांच्या क्लिपमध्ये, प्रेक्षक उत्साहात "अझघर" म्हणताना ऐकू येतात''. सध्या सर्वत्र या धक्कादायक व्हिडिओची मोठी चर्चा होताना दिसून येत आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट होताच लाखोंच्या संख्येने नेटकऱ्यांनी पाहिला आहे आणि अनेक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजनरे लिहिले आहे की,''वाट पाहणाऱ्या लोकांचा आदर'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' तो आजीच्या घरून परत आल्यासारखा दिसतो'' काहींनी गमतीदार तर काहींनी हैराण करणाऱ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Viral Video
Shocking Viral Video : क्रिकेटच्या मैदानात खेळाडूचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, VIDEO आला समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com