Relationship Drama: एका पतीने आपल्या पत्नीचा दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत तिला रंगेहात पकडल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये पतीचा संताप आणि त्याच्या भावना उघडपणे दिसून येतात. ''पाच वर्ष वाया घालवलीस तू!'' असा जोरदार आक्रोश करत तो पत्नीवर ओरडताना दिसतो. हा प्रकार नेमका कुठे घडला, हे अद्याप स्पष्ट नाही, मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.
माहितीनुसार, पतीला काही दिवसांपासून आपल्या पत्नीच्या वागणुकीबाबत शंका होती. मोबाईलवरील व्यवहार, अचानक घराबाहेर पडणे, रात्री उशिरा फोनवर बोलणे अशा अनेक गोष्टी त्याच्या लक्षात आल्या होत्या. त्यामुळे त्याने तिच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. एक दिवस त्याने पत्नीचा पाठलाग करत तिला एका हॉटेलजवळ दुसऱ्या पुरुषासोबत भेटताना पाहिले. हे पाहताच त्याचा संताप अनावर झाला आणि त्याने घटनास्थळी जाऊन पत्नीला आणि तिच्या प्रियकराला (boyfriend)रंगेहात पकडले.
व्हिडिओमध्ये पती जोरजोरात ओरडताना दिसतो – ''तू माझं आयुष्य बरबाद केलंस, पाच वर्ष मी तुला समजून घेतलं, प्रेम दिलं… आणि तू हे केलंस? का केलं असं?'' त्याचा भावनिक कोसळलेला आवाज अनेकांच्या काळजात घर करणारा ठरतो आहे. पतीने पत्नीला आणि तिच्या प्रियकराला लोकांसमोर उघड करून समाजात आणखी मोठा वाद निर्माण केला आहे.
हे प्रकरण सार्वजनिक ठिकाणी घडल्यामुळे आजूबाजूला मोठी गर्दी जमली. काहींनी मोबाईलवर व्हिडिओ शूट केला तर काहींनी घटनेचे थेट सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण केले. यामुळे प्रकरणाला अधिक वाचा फुटली. सध्या हा व्हिडिओ(VIDEO) एक्स(ट्वीटर)वरील @gharkekaleshया अकाउंटवर अपलोड केलेला आहे.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.