
सोशल मीडियावर दररोजच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मनोरंजक असतात, तर काही धक्कादायक दृश्यांनी प्रेक्षकांना थक्क करतात. अशा घटना सहज विसरता येत नाहीत. डिजिटल युगात कोणतीही गोष्ट क्षणार्धात व्हायरल होते. विशेषतः स्टंटचे व्हिडीओ लोकांच्या लक्षात राहतात. रील्ससाठी जीव धोक्यात घालून स्टंट करणाऱ्या तरुणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर वारंवार समोर येतात. रेल्वेगाड्यांमध्ये असे स्टंट करताना दिसणारे तरुण धोक्याचा खेळ खेळताना पाहायला मिळतात, ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. व्हायरल होण्यासाठी हा प्रकार वेगाने वाढताना दिसत आहे.
सिनेमांमध्ये स्टंटबाजी पाहताना आपल्याला थरारक अनुभव मिळतो, पण हे स्टंट प्रशिक्षित लोकांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय काळजीपूर्वक केले जातात. मात्र, सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि लाइक्स मिळवण्यासाठी अनेक जण खऱ्या आयुष्यात जीवघेणे स्टंट करताना दिसतात. असे स्टंट पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहवत नाही. सध्या अशाच प्रकारचा एक स्टंट एका तरुणीने केला, पण हा धाडसी प्रयत्न तिच्यावरच उलटला आहे. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तरुण पिढीचा हा ट्रेंड धोकादायक व चिंताजनक बनत चालला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये तरुणीने रीलसाठी जीवघेणा स्टंट करताना दिसते. व्हिडीओमध्ये ट्रेन वेगाने धावत असताना ती दरवाजाजवळ येते आणि बाहेर लटकून उभी राहते. मात्र, काही क्षणांतच तिचं डोकं एका खांबाला जोरात आपटतं. या धडकेनंतर ती ट्रेनला घट्ट पकडून उभी राहते, त्यामुळे ती खाली पडत नाही. तरीही, व्हिडीओमध्ये तिच्यावर झालेल्या जबर माराची तीव्रता स्पष्ट दिसते. अशा प्रकारचे स्टंट केवळ जीवासाठी धोकादायकच नाहीत, तर ते इतर प्रवाशांसाठीही त्रासदायक ठरू शकतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
@selfiee_of_kerala या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओला १९ लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. या व्हायरल व्हिडीओत तरुणीचा जीवघेणा स्टंट दिसतो. मात्र, ही घटना नेमकी कुठे घडली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. व्हिडीओने सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.