तुम्हालाही आरबीआयकडून मेल आलाय का...? अनेकांना मेल आलेयत...आणि लॉटरी लागल्याचा दावा करण्यात आलाय...या मेलच्या माध्यमातून, ज्यांना लॉटरी लागलीय त्यांचे बँक डिटेल्स आणि रक्कम देण्यासाठी काही पैसे मागितले जातायत...पण, खरंच आरबीआयने लॉटरी काढलीय का...? आरबीआयने अशी लॉटरी का काढलीय...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...हा पैशांचा विषय असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...
RBIने अनेकांना ईमेल पाठवलेयत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा देणगी कार्यक्रम 2026. ज्यांना लॉटरी लागलीय त्यांना मेल पाठवले असून, रक्कम देण्यासाठी बँक डिटेल्स मागवलेयत. हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...याबाबत अधिक माहिती आरबीआयकडूनच मिळू शकते...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने आरबीआयने असं कोणतं नोटिफिकेशन काढलंय का हे तपासून पाहिलं...? तसेच काही तज्ज्ञांकडून अधिक माहिती मिळवली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
RBIच्या नावाने लॉटरी लागल्याचा ईमेल बनावट
लॉटरीची रक्कम देण्यासाठी आधी पैसे मागितले जातात
लॉटरीच्या नावाने लोकांकडून पैसे उकळण्याचा डाव
RBIने लॉटरीसंदर्भात कोणताही ईमेल पाठवलेला नाही
कुणालाही बँक डिटेल्स शेअर करू नका
आरबीआयच्या नावाने क्रेडिटिंग फी मागवणारा बनावट ईमेल फिरत आहे...अनेक लोक सायबर फसवणुकीचे बळी ठरले आहेत. असेच एक प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे, ज्यात आरबीआयच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जातेय...त्यामुळे तुम्ही अशा कोणत्याही पैशांच्या आमिषाला बळी पडू नका...तुम्ही लॉटरीच काढली नाही तर तुम्हाला सहज कुणीही पैसे देणार नाही...त्यामुळे आमच्या पडताळणीत आरबीआयची लॉटरी लागल्याचा दावा असत्य ठरलाय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.