Fact Check: दिवाळीत 10, 20, 50च्या नोटांचा तुटवडा होणार,RBIकडून लहान नोटांची छपाई कमी? काय आहे सत्य?

RBI Fact Check : दिवाळीत १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा होणार असल्याचा मेसेज व्हायरल होतोय. मात्र, आरबीआय आणि पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा खोटा ठरवला आहे. जाणून घ्या या व्हायरल मेसेजमागचं सत्य.
RBI clarification on small denomination currency note shortage
RBI clarification on small denomination currency note shortage
Published On: 
Summary
  • दिवाळीपूर्वी १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा होणार

  • या मेसेजमध्ये आरबीआयच्या नावाने बनावट परिपत्रक प्रसारित

  • पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले.

दिवाळीत आता 10, 20 आणि 50 च्या नोटांचा तुटवडा भासणार आहे असा दावा करण्यात आलाय. आरबीआयच्या नावानेच हा मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे आता एकच खळबळ उडालीय. खरंच आता 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटा कमी होणार आहेत का? हे छोटं चलन जर कमी होणार असेल तर सुट्टे पैसे आणायचे कुठून? सगळीकडेच आता ऑनलाईन व्यवहार करायचे का? असे सवाल उपस्थित केले जातायत. त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केलीय. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

दिवाळीत नवीन 10, 20 आणि 50 च्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार नाहीत. लहान नोटांची छपाई कमी केली जातेय.

देशाला कमी-रोख अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी हे पाऊल उचललं जातंय

RBI clarification on small denomination currency note shortage
Fact Check: केंद्र सरकारकडून 8 हजारांचं दिवाळी गिफ्ट? अर्ज भरलेल्यांनाच मिळणार योजनेचा लाभ?

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या मेसेजमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नाव, लोगो आणि गव्हर्नर यांची सहीसुद्धा आहे. त्यामुळे अनेकांनी हा मेसेज पुढे शेअर केलाय. मेसेज प्रचंड व्हायरल होत असल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. या मेसेजमध्ये आणखी एक दावा करण्यात आलाय...लोकांना रोख रकमेऐवजी UPI, कार्ड आणि नेट बँकिंग वापरण्याचा सल्ला देण्यात आल्याचा दावा केलाय.

याचा अर्थ लोकांना लहान मूल्यांच्या नोटा मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. हा पैशाचा विषय असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली.आमच्या व्हायरल सत्य टीमने RBIकडून याबाबत माहिती मिळवली.त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

RBI clarification on small denomination currency note shortage
व्हिडीओ शेअर करत भाजप नेत्याच्या 26 वर्षीय मुलानं संपवलं जीवन, धक्कादायक कारण आलं समोर

व्हायरल सत्य/ साम इन्व्हिस्टिगेशन

10, 20, 50 च्या नोटांचा तुटवडा नाही

RBI कडून तुटवड्याबाबतची कोणतीही घोषणा नाही

लहान चलनी नोटांच्या पुरवठ्यात घट झाल्याचा दावा खोटा

लोकांना असे मेसेज पडताळून पाहिल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये. लोकांची दिशाभूल करण्यासाठी असे मेसेज व्हायरल केले जातात.असे मेसेज आल्यास आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन माहिती तपासा.आमच्या पडताळणीत दिवाळीत 10, 20 आणि 50 च्या नोटांचा तुटवडा होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.