दिवाळीत प्रत्येक नागरिकाला केंद्र सरकार 8 हजार रुपयांचं गिफ्ट देणार असल्याचा दावा करण्यात आलाय...हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय...यामुळे आता खरंच सरकार एवढं मोठं गिफ्ट देणार आहे का...? एवढं गिफ्ट मिळणार असेल तर ते सगळ्यांनाच मिळणार की त्यासाठी काही अट आहे...? असेही प्रश्न उपस्थित होतायत...त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...
केंद्र सरकार दिवाळीनिमित्त सर्वांना 8 हजारांचं दिवाळी गिफ्ट देणार आहे. ही रक्कम मिळवण्यासाठी मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. हा मेसेज व्हायरल होत असल्याने याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली...कारण सरकार 8 हजारांचं दिवाळी गिफ्ट देणार असेल तर चांगलीच गोष्ट आहे...त्यामुळे खरंच पैसे मिळणार आहेत का...? अशी योजना असेल तर ते पैसे कुणाला मिळणार...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...याबाबत आमच्या टीमने सरकारकडून अधिक माहिती मिळवली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
दिवाळीनिमित्त 8 हजार गिफ्टची केंद्राची योजना नाही
8 हजार रुपयांची भेट देणार असल्याची माहिती खोटी
स्कॅमर्स दिवाळी बोनसच्या नावाखाली बनावट लिंक पाठवतात
पैशाचं आमिष दाखवून फसवणूक करण्याचा डाव
कुणी पैशांचं आमिष दाखवल्यास बळी पडू नका
केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही...तुम्हाला जर केंद्र सरकारच्या नावाने 8 हजार रुपये देण्याचं कुणी आमिष दाखवत असेल तर काळजी घ्या...केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना जाहीर केलेली नाही.दिवाळी गिफ्टच्या नावाखाली लोकांना बनावट वेबसाइट्सच्या लिंक्स पाठवून फसवणुकीचा डाव आहे...यामुळे वैयक्तिक आणि बँकिंग माहिती चोरली जाऊ शकते...त्यामुळे तुम्हाला अशी लिंक आल्यास उघडू नका...तुमची फसवणूक होऊ शकते...त्यामुळे आमच्या पडताळणीत केंद्र सरकारकडून 8 हजारांचं दिवाळी गिफ्ट देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.