Viral Video: नो एन्ट्रीमध्ये गाडी चालवाल तर पडेल महागात..व्हायरल VIDEO पहाच

Raipur Viral Video: दर एक दिवसाला रस्ते अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्याने अनेक अपघात झाल्याचे समोर येतात.
Viral Video
Viral VideoSaam digital

No Entry Viral Video

दर एक दिवसाला रस्ते अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्याने अनेक अपघात झाल्याचे समोर येतात. अशातच या अपघाते प्रमाण कमी करण्यासाठी तसेच वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या लोकांसाठी रायपूर पोलीस वाहतूक व्यवस्थेने एक नवीन उपाय शोधून काढला आहे. सध्या सोशल मीडियावर मीडियावर रायपूरमधल्या या नवीन तंत्रज्ञानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Viral Video
Viral Video: कडाक्याच्या थंडीत शेकोटीजवळ बसलं होत कुटुंब; अचानक मोठा स्फोट झाला, हादरवणारा VIDEO

नक्की व्हिडिओत काय?

व्हिडिओत दिसते की, एका रस्त्यावर टायर क्लिकर लावण्यात आले आहेत. या टायर क्लिकरचा काळा आणि पिवळा रंग आहे. या क्लिकरच्या वरून अनेक वाहनांची ये-जा होत आहे.याच्या वापराने जर कोणी चुकीच्या बाजूने आपले वाहन नेले तर त्याच्या वाहनाचे टायर फुटू शकते.याच्या वापराने चुकीच्या मार्गाने येणाऱ्या वाहतुकीची समस्या काही प्रमाण कमी होईल.

टायर क्लिकर एका बाजूला टोकदार असतात. जर वाहन योग्य दिशेने चालवले तर ते स्पीड ब्रेकरचे काम करते, परंतु जर वाहन विरुद्ध दिशेने चालवले तर खिळे त्याच्या टायरला टोचून त्यामुळे टायर पंक्चर होऊ शकतो किंवा फुटू शकते.

व्हायरल व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवरील@Babymishra_या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे आणि व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे,'तुमच्या मते हे योग्य की अयोग्य?' राँग साइड ड्रायव्हिंग थांबवण्यासाठी तसेच वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ही अंमलबजावणी करण्यात येत आहे. वाहनचालकांसाठी या टायर किलरपासून काही अंतरावर फलक लावण्यात येणार असून, त्यामुळे वाहनचालकांनी सूचना मिळेल चुकीच्या बाजूने वाहने चालवू नयेत.

व्हायरल व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की,' प्राण्यांसाठी हे घातक आहे' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,'हे वाहन चालकांसाठी देखील धोकादायक आहे कारण एखाद्याचा चुकून अपघात झाला तर'.अशा प्रकारच्या विभिन्न प्रतिक्रिया व्हिडिओवर येत आहेत. व्हिडिओ हजारोंच्या घरात पाहिला गेला असून मोठ्या प्रमाणात व्हिडिओला लाईक्स मिळत आहेत.

Viral Video
Viral Video: सोशल मीडियावर लाईव्ह करत सांगत होता रस्त्याची स्थिती, तितक्यात मागून आली रिक्षा; पुढे जे झालं ते भयंकर होतं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com