Viral Video: कडाक्याच्या थंडीत शेकोटीजवळ बसलं होत कुटुंब; अचानक मोठा स्फोट झाला, हादरवणारा VIDEO

Amritsar Shocking Video: घराबाहेर शेकोटी घेत असताना शेकोटीचा स्फोट झालाय.सु्दैवाने शेकोटी घेत असलेल्या कोणाला काही झाले नाही
Amritsar Shocking Video
Amritsar Shocking VideoSaam Digital
Published On

सध्या राज्यभर कडाक्याची थंडी पडलेली आहे. थंडीपासून वाचण्यासाठी प्रत्येकजण शेकोडीची मदत घेत असतात. शेकोटी अन् अनेक गप्पागोष्टी असे काही स्वरुप सध्या राज्यभर दिसून येते. मात्र सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात घराबाहेर शेकोटी घेत असताना शेकोटीचा स्फोट झालाय.सु्दैवाने शेकोटी घेत असलेल्या कोणाला काही झाले नाही.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amritsar Shocking Video
Viral Video: वाह रे पठ्ठ्या! टिव्हीवर उमटवली श्री रामाची सावली; तरुणाच्या कलेला सलाम VIDEO

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पंजाबमधील अमृतसरमधला आहे.व्हिडिओत दिसते की, कुंटुबातील काही सदस्य घराबाहेर शेकोटीच्या भोवतीने बसलेले आहेत. त्यांच्या गप्पा रंगलेल्या आहेत. दरम्यान सदस्य बोलत असताना अचानक शेकोटीचा जोरात स्फोट होतो. स्फोट होताच सर्वजण बाजूला सरकतात. शेकोटीच्या लांब बसले असल्यामुळे कोणाला काही दुखापत होत नाही.

व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्म एक्सवरील@Gagan4344 या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये स्फोटाचे कारण सांगितले आहे. कारण असे आहे की,स्फोट उष्णतेच्या दाबामुळे झाला कारण त्यांनी कोणतीही वाळू न वापरता थेट सिमेंटच्या फरशीवर लाकूड ठेवून शेकोटी पेटवली होती'.

व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तूफान व्हायरल झाला आहे. व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून अनेक शेअर केला जातोय. व्हिडिओ पाहून एका यूजरने प्रतिक्रिया दिली आहे की,माय गॉड ते खूप धोकादायक होते, देवाचे आभार, लोहरी उत्सवात सर्वजण ठीक आहेत' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,'शिकण्यासारखा धडा'.

Amritsar Shocking Video
Viral Video: ऐकावं ते नवल! कुत्र्याने खाल्ले मालकाचे ३ लाख रुपये; कुत्र्याची प्रकृती बिघडल्याने प्रकार उघडकीस

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com