छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो 'बिग बॉस १७' (Bigg Boss 17) सध्या चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक सदस्य आपल्या कपड्यांच्या स्टाइलबाबत विशेष काळजी घेताना दिसतात. त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये जाण्यापूर्वी हे सदस्य सोबत खूप सारे कपडे घेऊन जातात. त्याचसोबत ते बिग बॉसच्या घरामध्ये असताना देखील त्यांचे स्टाइलिसिट (Bigg Boss Contestant Stylish) त्यांना बाहेरून कपडे पाठवत असतात.
बिग बॉसच्या घरातील सदस्यांच्या कपड्यांचा मुद्दा चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे 'बिग बॉस १७'च्या घरातील सदस्य ऐश्वर्या शर्माला सध्या तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे टार्गेट केले जात आहे. तिला वारंवार प्रत्येक जण याबाबत बोलून दाखवताना दिसतात. बिग बॉसच्या घरामध्ये आलेल्या अब्दूने मन्नाराला घरातील त्या सदस्याचे नाव सांगण्यास सांगितले होते ज्याला फॅशन सेन्स नाही. त्यावर मन्नाराने ऐश्वर्याचे नाव घेतलं होतं. ऐश्वर्याने देखील माझा स्टायलिश मला चांगले कपडे पाठवत नसल्याचे कबुल केले होते.
नुकताच आज तकने याबाबत एक स्पेशल रिपोर्ट केला आहे. त्यांनी रीमाशी संवाद साधला. रीमा ही गेल्या ४ ते ५ वर्षांपासून बिग बॉसच्या सदस्यांची स्टायलिश राहिली आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्य आपला फॅशनसेन्स व्यवस्थित असावा यासाठी काय करतात हे आपण पाहणार आहोत. आज तकशी बोलताना रिमाने सांगितले की, 'मी यावेळी मन्नाराची स्टायलिश आहे. यापूर्वी मी उर्फी जावेद , प्रतीक सेहजपाल, निर्मित, प्रियंका चहर, गौरी नागौरी, सुंबुल तौकीर या कंटेस्टंटला स्टाइल केले आहे. उर्फी बिग बॉसच्या घरामध्ये फार कमी वेळ राहिली असली तरी देखील तिची स्टायलिंगचा प्रवास इथूनच सुरू झाला.
'बिग बॉसच्या घरामध्ये जाणाऱ्या सदस्यांबाबत आम्हाला जशी माहिती मिळते. तसं आम्ही त्यांच्या स्टायलिंगवर काम सुरू करतो. त्यांच्या कपड्यांवर काम सुरू करतो. आम्ही त्यांचे बॉडी टाइप समजून घेतो आणि त्यानुसार त्यांना कपडे सजेस्ट करतो. एखाद्या सेलिब्रिटीला डीप नेक अथवा रिव्हिलिंग कपडे घालायचे असले तरी देखील आम्ही त्यांना ते देत नाही. आम्ही या गोष्टीची विशेष काळजी घेतो. या कपड्यांमुळे या सेलिब्रिटींना लाजीरवाणे वाटू नये याचा प्रयत्न आम्ही करतो.', असे रीमाने सांगितले.
रीमाने पुढे सांगितले की, 'आमच्यासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे इथे वेळ खूप कमी असतो. मन्नाराने मला तीन दिवसांपूर्वी सांगितलं होतं की ती बिग बॉसच्या घरामध्ये जाणार आहे. आम्ही तीन दिवसांमध्ये जवळपास ४९९ कपड्यांची ट्रायल केली होती. तर सुंबूलने शोमध्ये जाण्यापूर्वी एक तासाचा वेळ दिला होता. आम्ही तेवढ्या कालावधीत ३७ कपड्यांचे ट्रायल दिले होते. बऱ्याचदा बिग बॉसच्या घरामध्ये जाणारे सदस्य हे काही कपडे सोबत घेऊन जातात. त्यानंतर आम्ही त्यांना बाहेरून स्टायलिश कपडे पाठवतो.'
अंकिता लोखंडेने बिग बॉसच्या घरामध्ये जाण्यापूर्वी तब्बल २०० कपडे घेऊन गेली होती. असं खरंच शक्य आहे का असा प्रश्न रीमाला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तिने सांगितले की, 'हे स्पर्धकांवर अवलंबून आहे. मला मन्नाराच्या स्टाइलबद्दल माहिती होते. म्हणून मी तिला मर्यादित कपडे पाठले. तर सुंबुल आणि प्रतीकच्या वेळेला मला दर आठवड्याला किमान ३० ते ३५ कपडे पाठवावे लागले होते. मग ते स्पर्धक त्यांच्या आवडीनुसार आणि मूडनुसार कपडे निवडतात. आम्ही खूप सारे कपडे देतो कारण त्या स्पर्धकाला रंग आवडत नसेल, ते त्यांना फिट बसत नसतील किंवा त्यांना अशाप्रकारची कपडे आवडत नसतील तर त्यामुळे आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कारण कधी-कधी चांगली कपडे स्पर्धकांचा मूड पूर्णपणे बदलवतात. या कपड्यांमुळे स्पर्धकांमध्ये वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास देखील येतो.'
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.