Flood Viral Video: डोक्यावर बाळ अन् मागे बायको; पुरातून वाट काढत जाणाऱ्या बापाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ

Prayagraj Flood Viral Video: प्रयागराजमधील पुराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्हिडिओत एक कुटुंब कमरेएवढ्या पाण्यातून प्रवास करत आहे. यावरुन तेथील परिस्थिती किती जीवघेणी आहे हे लक्षात आलं आहे.
Flood Viral Video
Flood Viral VideoSaam Tv
Published On

उत्तर प्रदेशमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. गंगा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे सर्वत्र पाणी साचले आहेत. यामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी गेले आहे त्यामुळे कुटुंब आणी स्वत:चे संरक्षण करण्यासाठी अनेकजण घराबाहेर पडले आहेत. पुराच्या पाण्यातून वाट काढत सुरक्षित ठिकाणी जात आहेत याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहेत.

Flood Viral Video
Viral Video: मांडीवर मांडी अन् घट्ट मिठी, धावत्या रेल्वेत कपलचे अश्लील कृत्य; नक्की काय घडलं?

असाच एक उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील पुराचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये पुराच्या पाण्यातून एक कुटुंब नवजात बाळाला घेऊन प्रवास करताना दिसत आहे. चारही बाजूला संपूर्ण पाणीच पाणी आहे. यातून प्रवास करण्यासाठी त्यांना कोणतेही बोट किंवा बचाव मदतीसाठी उपलब्ध नव्हते. यामुळे हे कुटुंब नवजात बाळाला घेऊन प्रवास करत असल्याचं दिसत आहे.

उत्तर प्रदेशमधील पुरातून एक कुटुंब प्रवास करताना दिसत आहे. छातीएवढ्या पाण्यातून दोघं नवरा-बायको मुलाला घेऊन प्रवास करताना दिसत आहे. वडिलांनी आपल्या लहान मुलाला हातात घेऊन प्रवास केला आहे. कुटुंबाचा हा जीवघेणा प्रवास पाहून तुम्हालाही भीती वाटेल. फक्त हे एकच कुटुंब नव्हे तर अशी अनेक कुटुंब या पुराच्या पाण्यातून जीव वाचवण्यासाठी जीवघेणा प्रवास करत आहे. याचेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Flood Viral Video
T-20 Blast: IPL मध्ये फुसका बार निघाला, इंग्लंडच्या स्पर्धेत आतषबाजी केली; डावखुऱ्या गोलंदाजाची रेकॉर्डब्रेक बॅटिंग

उत्तराखंडच्या प्रयागराज येथील पावसाची परिस्थिती भयावह आहे. सोशल मीडियावर पुराचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. उत्तराखंडमधील नागरिकांना पुरपरिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे. ही पुराची परिस्थिती लवकरच कमी व्हावी, यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत.

Flood Viral Video
Viral Video: घर घेण्यासाठी मुलीची अनोखी शक्कल! एकाचवेळी केले २० मुलांना डेट अन् घेतले २० आयफोन, पुढे नक्की काय घडलं? Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com