बाबोss...पेन्शनचे ११०० रुपये काढायला बँकेत गेल्या, अकाउंटमध्ये ७४० कोटी; ४४० व्होल्टचा झटकाच बसला, रात्रभर झोप न लागल्यानं तब्येत बिघडली

viral banking news : एका गरीब महिलेच्या बँक खात्यात एक -दोन नाही तर ७४० कोटी रुपये जमा झाले. हे ऐकून या महिलेची झोपच उडाली. रात्रभर विचार करून त्यांना झोप लागली नाही. त्यामुळे तिची तब्येत बिघडली.
बाबोss...पेन्शनचे ११०० रुपये काढायला बँकेत गेल्या, अकाउंटमध्ये ७४० कोटी; ४४० व्होल्टचा झटकाच बसला, रात्रभर झोप न लागल्यानं तब्येत बिघडली
बाबोss...पेन्शनचे ११०० रुपये काढायला बँकेत गेल्या, अकाउंटमध्ये ७४० कोटी; ४४० व्होल्टचा झटकाच बसला, रात्रभर झोप न लागल्यानं तब्येत बिघडलीmeta ai
Published On

एक गरीब महिला. महिन्याला पेन्शन मिळतेय फक्त ११०० रुपये. त्यावरच बऱ्यापैकी घरचा गाडा हाकते. बँकेत हेलपाटे मारायचे तेव्हा कुठे ती रक्कम मिळते. त्यात दोन चार वस्तू आणल्या की संपले ते पैसे. अशावेळी जर बँक खात्यात शे-पाचशे किंवा हजारेक रुपये वाढून किंवा जास्तीचे आले तर काय तो आनंद. ते कसले पैसे, कसे आले, कुठून आले, असे एक ना अनेक प्रश्न पडतात. तेच लाखो रुपये खात्यात आले तर विचारायलाच नको. थेट डोकंच बाद होईल ना??? पण पेन्शन घेणाऱ्या एका गरीब महिलेच्या खात्यात हजारो नाही, लाखो नाही , एक - दोन कोटी नाहीत, तर चक्क ७४० कोटी रुपये जमा झाले. आयुष्यातच सोडा, एक दोन पिढ्याही एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबाला सेव्हिंग करता येणार नाही इतकी रक्कम जर बँक खात्यात जमा झाली तर झोप उडेलच ना...तशीच काहीशी अवस्था रेखा देवी नावाच्या महिलेची झाली. बिच्चारी रात्रभर झोपली नाही. मनात विचारांचा काहूर माजला होता. या सगळ्यामुळं तिची तब्येतच बिघडली.

बाबोss...पेन्शनचे ११०० रुपये काढायला बँकेत गेल्या, अकाउंटमध्ये ७४० कोटी; ४४० व्होल्टचा झटकाच बसला, रात्रभर झोप न लागल्यानं तब्येत बिघडली
65 पैकी 63 शाळा बोगस; शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात बडा मासा लागला गळाला, क्राइम ब्रांचची मोठी कारवाई

ही डिजिटली 'श्रीमंत' असलेली गरीब महिला बिहारच्या नवादाची. महिन्याला ११०० रुपये सरकारी पेन्शन. तेच पैसे काढायला त्या बँकेत गेल्या. तर त्यांच्या खात्यात ७४० कोटी रुपये जमा झालेले त्यांच्या निदर्शनास आले. इतके आकडे बघून त्यांना धक्काच बसला. बिच्चाऱ्या महिलेची तब्येतच बिघडली. खरे तर हार्ट अटॅक येता येता राहिला. रात्रभर त्या झोपल्या नाहीत. घशाखाली अन्नाचा घास उतरत नव्हता. सारखा मनात तोच विचार. इतके पैसे बँक खात्यात असल्याच्या विचारानेच त्यांना दरदरून घाम फुटला. भेदरल्या होत्या. या प्रकाराची चर्चा शहरात वाऱ्यासारखी परसली.

मिळालेल्या माहितीनुसार, नवादा शहरातील नीम टोला मोहल्ल्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबातील रेखा देवी या शुक्रवारी संध्याकाळी सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेतून मिळणारे ११०० रुपये काढण्यासाठी जवळच्याच ग्राहक सेवा केंद्रात गेल्या. त्यांचे एका राष्ट्रीय बँकेत खाते आहे. खात्यातून जेव्हा ११०० रुपये काढले त्यावेळी त्या ट्रान्झॅक्शनची पावती मिळाली. त्यावर बॅलन्स रक्कम बघून सेंटरचे चालक आणि रेखा देवी यांना धक्काच बसला.

बाबोss...पेन्शनचे ११०० रुपये काढायला बँकेत गेल्या, अकाउंटमध्ये ७४० कोटी; ४४० व्होल्टचा झटकाच बसला, रात्रभर झोप न लागल्यानं तब्येत बिघडली
Vietnam Boat Accident: मोठी बातमी! व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली, १५ जणांचा मृत्यू

रेखा देवी यांना मिळालेल्या पावतीवरील नमूद रकमेनुसार, त्यांच्या खात्यात ७४० कोटी ६८ लाख, ७२ हजार ८९५ रुपये ७८ पैसे अशी शिल्लक दिसून येत होती. त्यावर दीदी तुम्ही तर राजामाणूस झालात, असं थट्टेने तो संचालक म्हणाला. पण रेखा देवींना हा आकडा ऐकूनच धक्का बसला. या धक्क्यातून त्या सावरल्याच नाहीत. आम्ही खूपच गरीब घरातील आहोत. खात्यात एवढी रक्कम असल्याचे ऐकल्यापासून खूपच घाबरून गेली. रात्रभर झोपली नाही. टेन्शनमुळे तब्येत देखील बिघडली, असे रेखा देवींनी सांगितले.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com