Viral Video: नाच रे मोरा! पावसाच्या सरींसोबत मोराचे मोहक नृत्य; व्हिडिओ एकदा पाहा

Peacock Dance Video: सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल होतात जे प्रत्येकाला खूप आवडतात. सध्या हा व्हायरल झालेला व्हिडिओ चिमुकल्यांपासून ते वयोरुद्द व्यक्तींना आवडलेला आहे. नक्की काय आहे व्हिडिओत ते पाहा.
Peacock Dance Video
Viral VideoSaam Tv
Published On

अक्षय गवळी,साम टिव्ही

Beautiful Peacock Dance: कधी मोर नाचताना पाहिलाय का? अगदी थुई थुई नाचणारा मोर पर्यटकांसाठी पर्वणीच ठरतोय. अकोल्याच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विविध पक्षांनी नटलेला परिसर. याच परिसरात मोरांच मोठं वास्तव्य आहे.

दिनांक २६ एप्रिल रोजी अकोल्यात तुरळक पाऊस झालाआणि याच हलक्या पावसाच्या सरीत मोर पिसारा फुलवत टवटवीत नचतांना दिसू लागलाय. हेच मन मोहून टाकणारं मोराचं नृत्य कॅमेरात टिपलेय साम'चे प्रेक्षक तसेच छायाचित्रकार चंद्रकांत पाटील यांनी मोर (Peacock) आणि लांडोर पिसारा फुलवत नाचतानाचे दृश्य खास तुम्हा प्रेक्षकांसाठी घेऊन आलोय.

दरम्यान, काल शनिवारी दिवसभर उन-सावलीचा खेळ सुरू होता. आकाशातही ढग दाटून आले होते. त्यात तूरळक पाऊस झालाय. या वातावरणाची चाहूल लागल्यामुळेच मोरांनी असा पिसारा फुलवत केलेले नृत्य पाहायला मिळालेय

सोशल मीडियावर हा व्हिडिओ (Video) वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेला आहे आणि तो इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत फक्त इन्स्टाग्रावरचा हा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत आहे. अनोखा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून भरभरुन प्रतिक्रिया येत आहे.

Peacock Dance Video
Viral Video: तहानलेल्या वाघानं काय केलं पाहा; व्हिडिओ पाहून विश्वास बसणार नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com