Papa Ki Pari Fall In Valley: पापा की परीने गाठली खोल दरी...! दुचाकी अपघाताचा काळजात धडकी भरवणारा व्हिडीओ VIRAL

Viral Video: घाटातून फिरताना खाली दिसणारी खोल दरी पाहून अनेकांना येथे थांबून फोटो किंवा रिल्स बनवण्याचा मोह आवरत नाही.
Papa Ki Pari Fall In Valley
Papa Ki Pari Fall In ValleySaam TV
Published On: 

Girls Scooty Fall In Valley:

पावसाळा सुरू होताच पर्यटकांचे पाय डोंगरमाथ्यांच्या दिशेने वळू लागतात. पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात विविध ठिकाणी भेट देतात. घाटातून फिरताना खाली दिसणारी खोल दरी पाहून अनेकांना येथे थांबून फोटो किंवा रिल्स बनवण्याचा मोह आवरत नाही. असाच मोह काही तरुणींना झाला मात्र यामुळे त्यांच्यासोबत जे घडलं ते काळजाचा थरकाप उडवणारं आहे. (Latest Marathi News)

तीन तरुणींचा हा व्हिडीओ एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्कूटीवरुन तीन तरुणी डोंगरावर फिरत आहेत. घाट चढून थोडंवर गेल्यावर त्यांना खोल दरी दिसते. खोल दरी आणि तेथे फोटोशूट करण्यासाठी त्या खाली उतरतात. मात्र खाली उतरताच त्यांच्या स्कुटीचा तोल बिघडतो आणि त्या खाली कोसळतात.

Papa Ki Pari Fall In Valley
Choli Ke Peeche Kya Hai Viral Video: "चोली के पिछे क्या है..." गाण्यावर भन्नाट डान्स; दिल्ली मेट्रोमधील व्हिडीओ पाहून पोट दुखेपर्यंत हसाल

या तरुणींचं पुढे काय झालं. त्यांना वाचवण्यात यश आलं आहे की नाही याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. @nirmalogy या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओवर हसण्याचे इमोजी टाकण्यात आले आहेत. मुलींनी इथे थांबून मोठी चूक केलीये. रस्त्यात कुठे थांबावे याचे कॉमनसेन्स या मुलींमध्ये नाही असं दिसत आहे.

व्हिडीओमध्ये पाहून यात कोणतीही जीवितहानी झाली नसणार असं दिसत आहे. कारण मुली दरीत पडतात तेव्हा तिथे खूप झुडपं आहेत. त्या झुडपांमध्येच अडकल्या असतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात एका युजरने पापा की परी आणि गाठली खोल दरी अशी कमेंट केली आहे. या तरुणी थोडक्यात बचावल्या असल्यातरी पावसाळ्यात वाहन चालवताना योग्य ती काळजी घेणे गरजेचं आहे.

Papa Ki Pari Fall In Valley
Mosquito Viral Video: डास मारायला गेला अन् पाय मोडून घेतला; व्हिडिओ पाहून म्हणाल आईss गं!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.