Nagin Dance In Court: कोर्टात महिलेच्या अंगात शिरली नागिन; सापासारखा आवाज काढून नागिन डान्सचा VIDEO VIRAL

Nagin Dance Viral Video: कोर्टात सुनावणी सुरू असताना एका महिलेच्या अचानक अंगात आलं आहे.
Nagin Dance In Court
Nagin Dance In CourtSaam TV
Published On: 

Nagin Dance In Court:

लग्न समारंभात आतापर्यंत तुम्ही अनेकांना नागिण डान्स करताना पाहिलं असेल. इतकंच नाही तर बऱ्याच मालिका किंवा चित्रपटांमध्ये अभिनेत्रींच्या अंगात नागिण आल्याचं चित्र दिसतं. आता असं चित्र एका कौटुंबीक कोर्टात पाहायला मिळालं आहे. कोर्टात सुनावणी सुरू असताना एका महिलेच्या अचानक अंगात आलं आहे. (Latest Marathi News)

महिला जज समोर सुनावणी सुरू असताना अचानक खाली झोपून नाचू लागली. एखादी नागिण जशी वागते तसं ही महिला करत होती. तिने नागिण प्रमाणे आवाज देखील काढले. महिलांच्या अंगात देव येतात हे सर्वांना महित असेल मात्र एक नागिण महिलेच्या अंगात आल्याचं पहिल्यांदाच पाहायला मिळालं आहे.

Nagin Dance In Court
St Bus Video Viral: हातात छत्री घेऊन चालक चालवतोय बस; अहेरी आगारातील बसचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आलाय. हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. महिलेचा नागिण डान्स पाहून उपस्थित व्यक्तींमध्ये एकच गोंधळ उडाला. लोक तिच्यापासून दूरपळू लागले. महिलेलला नेमकं काय होतंय हे पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली.

@GoldySrivastav या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. २९ सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. सदर व्हिडीओ उत्तरप्रदेशच्या सहारनपुरमधील असल्याचं समजलं आहे.

Nagin Dance In Court
Choli Ke Peeche Kya Hai Viral Video: "चोली के पिछे क्या है..." गाण्यावर भन्नाट डान्स; दिल्ली मेट्रोमधील व्हिडीओ पाहून पोट दुखेपर्यंत हसाल

कोर्टात महिलेची नाटकं २० मिनिटे सुरूच राहिली. २० मिनीटांनंतर ती स्वत: शांत होऊन खाली बसली. यानंतर महिलेचे कुटुंबीय तिला घरी घेउन गेले. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी यावर भन्नाट कमेंट केल्यात. जजने महिलेच्या बाजूने निकाल द्यावा म्हणून ती असं करते अशी कमेंट एकाने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.