Metro Viral Video:
Metro Viral Video: Saamtv

Viral Video: आई आतमध्ये, बाळ बाहेर अन् मेट्रोचा दरवाजा बंद झाला, पुढे जे घडलं ते.. काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Metro Viral Video: बाबा गाडीचे चाक मेट्रोच्या दरवाजात अडकल्याने बाळाला आतमध्ये घेता येत नाही. इतक्यात मेट्रोचा दरवाजा बंद होतो मेट्रो निघूनही जाते अन् बाळ बाहेर राहते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Viral Video News:

सोशल मीडिया म्हणजे असंख्य व्हिडिओंचा खजिना. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडिओ इतके भयंकर असतात की पाहणाऱ्याच्याही अंगावर काटा उभा राहतो. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. यामध्ये आई आणि चिमुकल्यासोबत मेट्रो ट्रेनमध्ये चढताना घडलेला थरकाप उडवाणारा प्रसंग पाहायला मिळत आहे.

ट्रेनने, मेट्रोने प्रवास करताना काळजी घेण्याचे, चढताना, उतरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन नेहमी केले जाते. सोशल मीडियावर रेल्वे स्थानकावरील अपघातांचे तसेच मेट्रोमधील धक्कादायक घटनांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही घटना इतक्या भयंकर असतात की पाहणाऱ्याच्याही काळजाचा ठोका चुकतो. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

या व्हिडिओमध्ये आई अन् चिमुकल्या बाळासोबत मेट्रोमध्ये चढताना घडलेला धक्कादायक प्रकार पाहायला मिळत आहे. मेट्रोमध्ये चढताना आई आतमध्ये जाताचं दरवाजा बंद होतो आणि बाळ बाहेरचं राहते. धक्कादायक म्हणजे बाळ तसेच स्टेशनवर राहते आणि मेट्रो निघून जाते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Metro Viral Video:
Pankaja Munde : पक्षाने माझ्यावर दिलेली जबाबदारी मी सन्मानाने स्वीकारते; लोकसभा उमेदवारीवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेट्रो स्थानकावर मेट्रो येताच आई लगबगीने वर चढते. त्यानंतर ती बाबा गाडीमध्ये बसलेल्या बाळाला वर घेण्याचा प्रयत्न करते. मात्र बाबा गाडीचे चाक मेट्रोच्या दरवाजात अडकल्याने बाळाला आतमध्ये घेता येत नाही. इतक्यात मेट्रोचा दरवाजा बंद होतो मेट्रो निघूनही जाते अन् बाळ बाहेर राहते.

हा सर्व प्रकार स्टेशनवर बसलेली एक बेघर व्यक्ती पाहते आणि ती त्या बाळाला खेळवताना दिसत आहे. सार्वजनिक वाहतूकीने प्रवास करताना बाळासोबत असलेल्या आईने काळजी घेणे गरजेचे आहे, असा कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आला आहे. यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून सर्वांनी त्या बेघर व्यक्तीचे कौतुक केले आहे. (Latest Marathi News)

Metro Viral Video:
Loksabha Election 2024: जळगावमध्ये नणंद विरुद्ध भावजय लढत रंगणार? रोहिणी खडसेंच्या उमेदवारीबाबत जयंत पाटील यांचे सूचक विधान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com