गुजरात राज्यात असे काही दृश्य पाहायला मिळाले, जे पाहून कोणीही थक्क होई. जुनागढ जिल्हयातील खंभाळीया येथे आयोजित कविराज जिग्नेश यांच्या डायरो कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांनी मंचावर बसलेल्या भजन गायकावर नोटांचा पाऊस पाडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून लोक यावर वेगवेगळया प्रतिक्रिया देत आहेत. भजन कार्यक्रमात नोटांचा इतका मोठा पाऊस याआधी क्वचितच कोणी पाहिला असेल. प्रेक्षकांनी सुरुवातीला हाताने नोटा फेकण्यास सुरुवात केली, पण जसा कार्यक्रम पुढे गेला, तसे काही लोक नोटा पिशव्या आणि पोत्यांमध्ये भरून मंचावर फेकू लागले.
'डायरो' हा गुजरातचा पारंपरिक लोकसंगीत प्रकार आहे. ज्यामध्ये भजन आणि कथा या दोन्हीचे मिश्रण असते. यामध्ये कलाकार लोकगीते आणि भजनांच्या माध्यामातून धार्मिक आणि सामाजिक संदेश देतात. कविराज जिग्नेश हे या क्षेत्रातील अत्यंत प्रसिद्ध भजन गायक आहेत. त्यांनी गायलेली भजने लोकांच्या मनाला स्पर्श करतात आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय करून सोडतात.
कार्यक्रमादरम्यान प्रेक्षक भजनांच्या सुरावर डोलत मंचावर नोटा फेकत होते. सुरुवातील लोक नोटा किंवा छोटे बंडल फेकताना दिसले, पण काही वेळातच लोक थेट पिशव्या आणि पोत्यांमध्ये भरलेले पैसे घेऊन मंचावर आले. व्हायरल व्हिडिओमध्ये मंचावर नोटांचा ढीग साचल्याचे स्पष्ट दिसत आहे. आयोजन समिती आणि स्वयंसेवक या नोटा गोळा करून व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत होते तर दुसरीकडे भजन गायक आपल्या गायनात मग्न होते.
या कार्यक्रमात जमा झालेले पैसे कोणत्याही वैयक्तिक फायद्यासाठी वापरले जाणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. हे सर्व पैसे धार्मिक आणि समाजसेवेच्या कामांसाठी वापरले जातील. प्रामुख्याने, या पैशांचा वापर 'आहिर चॅरिटेबल ट्रस्ट' अंतर्गत गुजरातमध्ये 'आहिर कन्या छात्रालय' (मुलींचे वसतिगृह) आणि शैक्षणिक संकुलाच्या उभारणीसाठी केला जाईल. याशिवाय, भविष्यातील धार्मिक कार्यक्रम आणि समुदाय कल्याणाशी संबंधित उपक्रमांसाठीही या निधीचा वापर केला जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.