घराच्या कोपऱ्यात लपलेला तब्बल १२ फूट अजगर; व्हिडिओ पाहून शहारे येतील

Python In House: घराच्या कोपऱ्यात लपलेला एक तब्बल १२ फूट लांब अजगर सापडला. अजगर पाहताच घरात एकच घबराट उडाली. हा थरकापजनक व्हिडिओ पाहून अंगावर शहारे येतील, नक्की पाहा!
Python In House
Saam Tv
Published On

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यातील चांदपूर परिसरातील एका घरात घडलेली घटना सध्या चर्चेचा विषय बनलेली आहे. एका घरात अचानक तब्बल १२ फूट लांब अजगर शिरल्याने परिसरात एकच खळबळ माजली. ही घटना इतकी धक्कादायक होती की घरातील महिला आणि लहान मुले भीतीने किंचाळू लागली, तर काहीजण थरथरत घराबाहेर धावत गेले.

जंगल आणि नहरजवळचं घर, जीवघेणं संकट

ही घटना चांदपूर परिसरातील एका घनदाट वस्तीमध्ये घडली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, या भागात जवळच लहान जंगल असल्यामुळे साप(Snake), विंचू शिवाय अजगर यांसारखे वन्यप्राणी वेळोवेळी घरांमध्ये घुसण्याच्या घटना घडत असतात. मात्र, यावेळी हा अजगर इतका मोठा आणि धोकादायक होता की तो पाहून सर्वांनाच धक्काच बसला.

किंचाळत सुटले घरातील लोक, मुले दहशतीत

अजगर घरात घुसल्याचे लक्षात येताच घरातील सदस्यांची एकच धावपळ सुरू झाली. लहान मुलं रडायला लागली, महिलांनी मदतीसाठी आवाज दिला. काही वेळातच आजूबाजूच्या शेजाऱ्यांनीही धाव घेतली. अजगर किचनमधून हॉलमध्ये आणि नंतर घराच्या कोपऱ्यात लपला होता. तो पाहून घरातील लोकांनी वन विभागाला तातडीने माहिती दिली

हा व्हिडिओ(Video) सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील pulsewithsujata या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. एका यूजरने म्हटलं आहे,''देवा किती ते भयानक आहे'' दुसऱ्या यूजरने म्हटलं,''आमच्या घरात झालं असतं तर ते मी घरच सोडलं असतं'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Python In House
अबब! एक वर्षाच्या चिमुकल्याच्या चाव्यानं कोब्रा ठार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com