Bihar Incident
Child killed SnakeSaam Tv

अबब! एक वर्षाच्या चिमुकल्याच्या चाव्यानं कोब्रा ठार

Child killed Snake: एका वर्षाच्या चिमुकल्याने कोबऱ्याला चावून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सर्पदंशानंतर बाळाला विषबाधा झाली नाही, आणि तो आता पूर्णपणे सुरक्षित आहे. ही घटना सर्वांनाच चकित करणारी ठरली आहे.
Published on

Bihar Incident: सामान्यत साप चावल्याची घटना ऐकली की सर्वांच्याच अंगावर काटा येतो. पण बिहारमधील बेतिया येथे घडलेली घटना ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. चक्क एका वर्षाच्या बाळाने विषारी कोबऱ्याला चावलं आणि आश्चर्यकारकरीत्या त्या चाव्यामुळे सापाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

काय घडलं नेमकं?

बेतिया जिल्ह्यातील एका खेडेगावात ही घटना घडली. एक वर्षाचा बालक अंगणात खेळत असताना त्याच्या जवळ एक विषारी कोबरा सरपटत आला. बाळाला साप म्हणजे धोका हे कळत नव्हतं. त्याने सापाला (Snake) खेळण्याचं समजून हातात घेतलं आणि त्याच्या अंगावर चावलं.

सापाच्या चाव्यामुळे बाळाला थोडंसं बेशुद्ध वाटू लागलं आणि मग कुटुंबीयांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या मात्र बाळाला काही झाले नव्हते. सध्या हा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेला आहे.

ही घटना घडल्यानंतर संपूर्ण गावात खळबळ माजली आहे. लहान बाळ आणि साप यांच्यात झालेला हा संघर्ष ऐकून आणि पाहून अनेक गावकरी अचंबित झाले आहेत. काहींनी ही घटना चमत्कार मानली, तर काहींनी ती निसर्गाचा विचित्र नमुना मानला. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं की,''अशा प्रकारची घटना आमच्या जन्मातही पाहिली नव्हती'' तर काहींनी म्हटलं की,'' काहीही होऊ शकत आता'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Bihar Incident
100 Snakes In 1 House: अबब! घराच्या कोपऱ्यात तब्बल १०० साप; पाहा हा भयावह व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com