रुळावर झोपत जीव संपवण्याचा प्रयत्न; पुढे काय घडलं पाहाच

Mira Road Station Shocking Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे मुंबईमधील मीरारोड स्टेशनवर एका व्यक्तीने रेल्वे रुळावर झोपून आत्महतेचा प्रयत्न केला आहे.
Mira Road Station Shocking Video
Saam Tv
Published On

Mira Road Station Video: मुंबई उपनगरी रेल्वे स्थानकांवरील अपघात आणि आत्महत्येचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यातत बुधवारी दुपारच्या सुमारास मीरारोड स्थानकात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने थेट रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मोटरमनच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला. हा प्रकार पाहून उपस्थित प्रवाशांच्या अंगावर काटा आला.

दुपार असो वा सकाळ मुंबईकडे(Mumbai) जाणाऱ्या अपडाऊन लोकल गाड्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. त्यातच एका लोकल ट्रेनचा मोटरमन मीरारोड स्थानकात पोहोचत असताना त्याला रुळावर काहीतरी हलचाल जाणवली. थोडक्यात निरीक्षण करताच, त्याला एक व्यक्ती रुळावर आडवी झोपलेली दिसली. क्षणाचाही विलंब न करता मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक दाबून ट्रेन काही फूटांवर थांबवली.

रेल्वे थांबवल्यानंतर तो व्यक्ती स्वत:हा उठून बाजूला होतो आणि रेल्वे पुन्हा सुरळीत होते. सर्व प्रकार रेल्वेमधील प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केला आहे. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे त्यानंतर या व्हिडिओला असंख्य लाईक्स आणि व्ह्यूज मिळालेले आहेत. शिवाय नेटकरी वर्गातून विविध प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.

ही घटना पाहिल्यानंतर मुंबई लोकलमधील(Mumbai Local) अनेक घटना प्रवाशांच्या लक्षात आल्या. मात्र, या घटनेवर एका यूजरने म्हटलं की,''चांगलाच हाणायला पाहिजे होता याला'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''यांना मुंबई लोकलच का दिसते'' तिसऱ्या यूजरने म्हटलं,''मी असतो तर चांगलाच मारला असता याला'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Mira Road Station Shocking Video
Mumbai Local Train Video: अर्रर्र! मुंबई लोकलमध्ये महिला आणि किन्नरमध्ये जोरदार हाणामारी; एकमेंकीना धू धू धूतले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com