Viral Video: कडाक्याच्या थंडीत लेकरासाठी केली स्पेशल सोय; नेटकरी म्हणाले शेवटी बाप तो बापच

Father and Son Bonding Viral Video: चिमुकल्याबाळासह जाताना रात्री अंधार पडलाय. अशात कडाक्याची थंडी देखील वाजत आहे. आपल्या बाळाच्या रक्षणासाठी या व्यक्तीने बाळाच्या अंगावर शॉल पांघरली आहे.
Viral Video
Viral VideoSaam tv
Published On

Father and Son Bonding:

आई म्हणजे आपल्या सर्व चुकांना माफ करणारी माऊली. तर बाबा म्हणजे प्रत्येक चुकीतून आपण काय शिकलो ते दाखवून देणारी व्यक्ती. आईच्या मायेवर अनेक कविता आणि चारोळ्या तुम्ही ऐकल्या असतील. आई आपल्या लेकरांवर करत असलेल्या प्रेमाचे देखील अनेक व्हिडीओ पाहिले असतील. अशात सध्या सोशल मीडियावर बाप लेकाच्या नात्यातला एक सुंदर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Viral Video
Wedding Viral Video: ढोल-ताशा, बँड बाजा काहीच नाही, मग वरातीत गाण्यांचा आवाज कुठून येतोय? पाहा VIDEO

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की,एक व्यक्ती आपल्या लेकरांसह दुचाकीवरून जात आहे. चिमुकल्याबाळासोबत जाताना रात्री अंधार पडलाय. अशात कडाक्याची थंडी देखील वाजत आहे. आपल्या बाळाच्या रक्षणासाठी या व्यक्तीने बाळाच्या अंगावर शॉल पांघरली आहे. तसेच आपल्या अंगावर देखील त्याने ही शॉल घेतली आहे.

दुचारीवर चिमुकला आपल्या बाबांना पकडून मागे बसला आहे. आता थंड हवेमुळे तो झोपून गेला तर खाली पडण्याची भीती. त्यामुळे पित्याने एका हाताने आपल्या मुलाला पकडलंय. तर दुसऱ्या हाताने दुचाकीचे हँडल पकडून गाडी चालवत आहे. प्रवास करताना आपल्या बाळाला काही होऊनये यासाठी बापाने घेतलीही काळजी एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केली आहे.

तसेच या घटनेचा व्हिडीओ @Abhinavpandey या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट केलाय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओ पोस्ट करत यावर वडिलांचं प्रेम आईपेक्षा कमी नसतं. फक्त ते आपलं प्रेम व्यक्त करत नाहीत. कारण प्रेम व्यक्त करण्याची त्यांची पद्धत वेगळी असते. कदाचीत ती पद्धत अशी असते, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

आई-बाबा आणि लहान मुलांच्या नात्यातील प्रेमाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ देखील एक बाबा आपल्या मुलांवर किती प्रेम करतो त्यांना किती जीव लावतो हे दाखवत आहे. लहान मुलं कोणत्याही गोष्टीचा हट्ट् करतात त्यावेळी बाबांकडून ओरडा आणि वेळ पडल्यास दोन धपाटे दिले जातात. म्हणजे बाबा फक्त कडक स्वभाव आणि शिस्तीचे असतात असं नाही. तेही आपल्या मुलांवर जिवापाड प्रेम करतात, असं या व्हिडीतून जाणवत आहे.

Viral Video
Mumbai Crime News: क्लिनीकमध्ये आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; धक्कादायक घटनेनं मालाड हादरलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com