लाडकी योजनेची e-KYC वेबसाईट पुन्हा सुरू? अपात्र लाडकींना पुन्हा अर्ज भरता येणार?

Ladki Bahin Scheme e-KYC Fact Check: आता लाडकी योजनेतील ईकेवायसी करण्यासाठी वेबसाईट पुन्हा सुरू केल्याचा दावा करण्यात आलाय. सोशल मीडियावर असा मेसेज व्हायरल केला जातोय. पण, खरंच सरकारने पुन्हा लाडकींच्या ईकेवायसीसाठी साईट सुरू केलीय का? याची आम्ही पडताळणी केली, त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात.
Ladki Bahin Scheme e-KYC Fact Check
Fact check of viral Ladki Bahin Yojana e-KYC message
Published On: 
Summary
  • e-KYC वेबसाईट पुन्हा सुरू झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल.

  • लाडकी बहीण योजनेच्या व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

  • अपात्र लाडकी बहीण लाभार्थींना पुन्हा अर्ज करता येणार का?

लाडकी बहीण योजनेची ई केवायसी वेबसाईट पुन्हा सुरू झाल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय.या मेसेजमुळे ज्या महिलांनी लाडकीची ईकेवायसी भरलेली नाही, त्यांना पुन्हा अर्ज भरता येणार आहे असा दावा करण्यात आलाय. हा मेसेज तुफान व्हायरल होतोय. कारण, बऱ्याच महिलांची ईकेवायसी झालेली नसल्याने लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे खरंच सरकारने पुन्हा ईकेवायसीसाठी वेबसाईटवर सेवा सुरू केलीय का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया पुन्हा सुरू झालीय.पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन झाल्याने ओटीपी येत नाहीये. हा मेसेज व्हायरल होतोय, त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने थेट सरकारची वेबसाईट पाहिली. त्यावर ईकेवायसी अपडेट होतेय का हे पाहिलं मात्र, आम्ही ही साईट पाहिली असता, तिथे इकेवायसी अपडेट होताना अडचण आली. त्यामुळे आमच्या टीमने थेट यासंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

Ladki Bahin Scheme e-KYC Fact Check
IAS Transfer: IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्यातील प्रशासनात मोठा फेरबदल, कोणाची कुठे झाली पोस्टिंग?

साम इन्व्हिस्टिगेशन

लाडकीसाठी नोंदणी प्रक्रिया, ईकेवायसी सुरू झालेली नाही

कुणीही कुठल्याही केंद्रावर जाऊन नोंदणी करू नका

मोबाईलवर लिंक आली तर क्लिक करू नये

लिंक क्लिक केल्यास ओटीपी कोणालाही देऊ नये

लाडकीच्या नावाने तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते.

Ladki Bahin Scheme e-KYC Fact Check
Government Scheme: ऐन दुष्काळात राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारची महत्त्वकांक्षी योजना बंद

त्यामुळे तुम्हाला कुणी सांगितलं की, लाडकीच्या ईकेवायसीची साईट ओपन झाली तर विश्वास ठेवू नका...कारण, अशा प्रकारे तुमची फसवणूक होऊ शकते. जर नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू झाली तर सरकार अधिकृत माहिती देतं तसेच अधिकारीही याबाबत माहिती देतात. त्यामुळे आमच्या पडताळणीत लाडकी योजनेत ईकेवायसी अपडेट करण्यासाठी साईट पुन्हा सुरू झाल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.