लाजवाब! "एक नंबर, तुझी कंबर" गाण्यावर चिमुरडीचा भन्नाट डान्स; VIDEO व्हायरल

Cute Baby Dance Video: एक नंबर, तुझी कंबर या गाण्यावर चिमुकलीनं दिलेला गोंडस ठुमका सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिचा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं असून हा व्हिडिओ सगळीकडे धुमाकूळ घालतोय.
Cute Baby Dance Video
cute toddler dancing to Ek Number Tujhi Kambar wins hearts online with her adorable expressions and perfect movesSaam Tv
Published On

Dance Video: सध्या सोशल मीडियावर एक गोड व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. 'एक नंबर, तुझी कंबर' या लोकप्रिय गाण्यावर एका चिमुकलीने केलेला डान्स पाहून नेटकर्‍यांची मनं जिंकली आहेत. तिचे सहज आणि निरागस हावभाव, गोड हसू आणि आत्मविश्वासाने भरलेली स्टेप्स पाहून अनेकांचे चेहरे खुलले आहेत.

एक नंबर तुझी कंबर हे मराठमोळं गाणं मागील काही काळात खूपच लोकप्रिय झालं आहे. त्याच्या शब्दांत मजा, संगीतात जोश आणि लयीत नाचण्याची प्रेरणा आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण या गाण्यावर रील्स (Reels) बनवत आहेत. या गाण्याच्या पार्श्वभूमीवर चिमुकलीचा डान्स हा केवळ मनोरंजन नाही तर तिचा आत्मविश्वास, कलेप्रती ओढ आणि भोळेपणाचं दर्शनही घडवतो.

इन्स्टाग्राम आणि फेसबुकसह यूट्यूबवर हा व्हिडिओ धूमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये साधारण ५-६ वर्षांची एक चिमुरडी 'एक नंबर, तुझी कंबर' या जोशपूर्ण गाण्यावर डान्स करताना दिसते. तिचे हावभाव, चेहर्‍यावरचे एक्स्प्रेशन्स आणि लयबद्ध ठुमके थेट मनात घर करतात.

या व्हिडिओने (Video)अल्पावधीतच लाखो व्ह्यूज मिळवले आहेत. कॉमेंट बॉक्समध्ये लोकांनी तिच्या डान्सचे भरभरून कौतुक केले आहे. काही जणांनी "इतकी गोड, एकदम स्टेज रेडी आहे," असे म्हटले आहे, तर काहींनी "हे पाहून दिवसभराचं टेन्शन दूर झालं" अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

Cute Baby Dance Video
भरवर्गात शिक्षिकेने लावला ठेका; लहानग्या विद्यार्थिनींसह 'वाका वाका' वर केला धमाकेदार डान्स; VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com