
Dance Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे, ज्या व्हिडिओमध्ये एका शाळेच्या शिक्षिकेला तिच्या विद्यार्थिनींसह वर्गात थिरकताना पाहायला मिळतं. हे गाणं काही वेगळं नाही, तर जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेलं शकीराचं वाका वाका(This Time for Africa) या गाण्याच्या ठेक्यावर वर्गातला संपूर्ण माहोलच उत्साही झाल्याचं व्हिडीओत दिसतं. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून कौतुकाचं पाऊस पाडलं आहे, तर काहींनी ‘आमच्या वेळी अशी शिक्षक असती तर?’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
या व्हायरल(Viral) व्हिडीओमध्ये एक शिक्षिका वर्गात उभी असून तिच्यासमोर विद्यार्थिनी उभ्या आहेत. वाका वाका गाणं सुरू होताच शिक्षिका आणि विद्यार्थिनी एकाच ठेक्यावर नाचायला लागतात. दोघींच्या चेहऱ्यावर हास्य आणि उत्साह स्पष्ट जाणवत आहे. एकंदरित वातावरण खूपच सकारात्मक आणि आनंददायी वाटतं. शाळेत शिक्षणाबरोबर आनंदाने वेळ घालवण्याचाही किती चांगला अनुभव असतो, हे या व्हिडीओतून दिसून येतं.
गेल्या काही वर्षांपासून शिक्षणपद्धतीत मोठे बदल होत आहेत. पारंपरिक शिकवण्याच्या पद्धतीपेक्षा विद्यार्थ्यांच्या सहभागावर आणि अनुभवात्मक शिक्षणावर भर दिला जातोय. नृत्य, गाणी, खेळ, आणि इतर सर्जनशील पद्धतींनी शिकवणं विद्यार्थ्यांना आकर्षित करतं, तसंच शिकवलेलं दीर्घकाळ लक्षात राहतं. या व्हिडीओतील शिक्षिका याच बदलाचं उत्तम उदाहरण आहेत. त्यांनी विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, आनंद आणि टीमवर्क यांचा समावेश करत शिकवण्याचं नवं स्वरूप सादर केलं आहे
हा व्हिडीओ(Video) सोशल मीडियावर पोस्ट होताच काही तासांतच हजारो व्ह्यूज, लाईक्स आणि शेअर्स मिळाले. अनेकांनी कमेंट्समध्ये लिहिलं की,''आमच्या शाळेत अशी शिक्षिका असती तर शाळा सुट्टीच वाटली नसती. ''हेच आहेत खरे शिक्षक, शिक्षणासोबत आनंददायी वातावरण निर्माण करणारे'',''वर्ग म्हणजे फक्त धडे नाही, हे असं शिक्षण कायम लक्षात राहतं'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.