Viral Video: टाळ्या अन् शिट्यांनी दाद, आज की रात गाण्यावर चिमुकल्याने लगावले ठुमके; रेस्टॉरंटमधील VIDEO व्हायरल

Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका चिमुकल्याचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतील आलेला आहे शिवाय अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.
Dance Video
Viral VideoSaam Tv
Published On

Little Boy Dance Video: सोशल मीडियावर दर दिवसाला अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ थरारक गुन्हेगारीचे असतात तर कधी भयानाक अपघाताचे असतात. मात्र त्यातही बऱ्याचदा चिमुकल्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. जे पाहून नेटकरी वर्गात चर्चेचा विषय ठरतात.सध्या असाच एक चिमुकल्याच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ एका लहान मुलाच्या डान्सचा आहे. व्हिडिओत सुरुवातीस पाहिले तर एक कुटुंब हॉटेलमध्ये जेवणासाठी बसलेले आहे काही वेळात त्या कुटुंबातील एक चिमुकला जेवणाच्या टेबलवर उभा राहतो आणि त्याच हॉटेलमध्ये''आज की रात'' हे सुरु असलेल्या या गाण्यावर चिमुकला डान्स करतो.त्याचा डान्स पाहिल्यानंतर तिथे असलेला प्रत्येकजण खुर्चीवरुन उठून चिमुकल्याचा डान्स मोबाईलमध्ये कैद करताना दिसून येत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे मात्र तो व्हिडिओ ''baby_sayansh'' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. एवढेच नाही तर या अकाउंटवर या चिमुकल्याचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहे. व्हिडिओला सध्या लाखो नेटकऱ्यांनी पसंती दिलेली आहे.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

चिमुकल्याचा डान्स पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेटबॉक्समध्ये कौतुकाचा वर्षाव केलेला आहे. त्यातील पहिल्या यूजरने लिहिले आहे की,''अतिशय मस्त डान्स केला आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''माहोल तयार केला'' शिवाय आणखी यूजर्संनी,''चिमुकल्याने छान डान्स केला'',अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Dance Video
Dance Video: भावा कडक! 'मला भुताने पछाडलं' गाण्यावर तरुणाचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले दिवाने

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com