Gautami Patil Name Tattoo: गौतमीसाठी काय पण! कट्टर फॅनने कहरच केला, कृत्य पाहून तुम्ही म्हणाल...

Fan Gets Gautami Patil Name Tattoo On Hand: गौतमी पाटीलच्या एका कट्टर फॅनने थेट गौतमीचं नावच हातावर गोंदवून घेतलं आहे.
Gautami Patil Name Tattoo
Gautami Patil Name TattooSaam tv
Published On

Lavani Dancer Gautami Patil News: प्रसिद्ध नृत्यंगणा गौतमी पाटीलची क्रेझ तरुणांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे . गौतमीचे आता राज्यभरात चाहते निर्माण झाले आहेत. गौतमीला पाहण्यासाठी पुरुषांसोबत आता स्त्रिया देखील गर्दी करू लागल्या आहेत. गौतमीसाठी तरुण काहीही करायला तयार असतात. अशातच गौतमी पाटीलच्या एका कट्टर फॅनने थेट गौतमीचं नावच हातावर गोंदवून घेतलं आहे. तिच्या या फॅनची सर्वत्र चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

गौतमी पाटील सध्या नेहमीच चर्चेत असते. गौतमी राज्यभरातील बहुतांश तरुणांच्या मनात अधिराज्य गाजवत आहे. गौतमी पाटील आता राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरत आहे. गौतमीने नुकतीच खासदार उदयनराजे भोसले यांची साताऱ्यात सदिच्छा भेट घेतली होती. यावेळी गौतमीने खासदार उदयनराजे भोसले यांना त्यांचा आवडता परफ्युम भेट दिला.

Gautami Patil Fan
Gautami Patil Fan Saam TV

तर दुसरीकडे बारामतीत गौतमीने लवकरच लग्न करणार असल्याचे जाहीर केले. अनुरुप वर मिळाला की सर्वांना निमंत्रण देणार आहे, असेही गौतमी म्हणाली होती. याचदरम्यान, दुसरीकडे सोशल मीडियावर गौतमीच्या लग्नाची चर्चा सुरू असताना तिच्या कट्टर फॅनने हातावर तिचे नावच गोंदवून घेतले आहे. गौतमीच्या कट्टर फॅनचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. टॅटू गोंदवणारा फॅन हा साधा कॉलेजमध्ये जाणारा विद्यार्थी असल्याचं दिसत आहे.

Gautami Patil Name Tattoo
Mayuri Utekar: मयुरीचा मधाळ अंदाज पाहून व्हाल फिदा

दरम्यान, गौतमीची दिवसेंदिवस क्रेझ वाढत असताना तिच्या विरोधात बार्शी पोलिसांत तक्रार देखील दाखल झाली आहे. तक्रारदाराने गौतमीमुळे नुकसान आणि बदनामी झाली असल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. यामुळे गौतमी विविध विषयांमुळे चर्चेत येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com