Cobra Protect Tomatoes: बॉडीगार्डनंतर आता किंग कोब्रा करतोय टोमॅटोचं रक्षण; व्हिडिओ पाहून पोटदुखेपर्यंत हसाल

Tomato and King Cobra Trending Video :किंग कोब्रावर सोपवलं सर्वात मोठं काम; मालकाने बसवलं थेट टोमॅटोचं रक्षण करायला, पाहा व्हिडिओ
Cobra Protect Tomatoes
Cobra Protect TomatoesSaam TV
Published On: 

Cobra On Tomato Viral Video : राज्यात सर्वत्र महागाईचा भडका उडाला आहे. अशात पालेभाज्यांसह टोमॅटोच्या दरांनी उच्चांकी गाठली आहे. टोमॅटोच्या दरात वाढ होत असल्याने सामान्य कुटुंबातील व्यक्तींनी भाजीत टोमॅटो टाकणं बंद केलं आहे. अगदी सोन्याच्या दरांप्रमाणे टोमॅटोचे दर वाढल्याचे दिसत आहेत. टोमॅटोच्या वाढत्या किंमतीमुळे आतापर्यंत अनेक अतरंगी मिम्स व्हायरल झालेत. अशात एक किंग कोब्रा साप टोमॅटोचे रक्षण करत असल्याचा भन्नाट व्हिडिओ समोर आलाय. (Latest

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक किंग कोब्रा साप आपला फणा काढून उभा आहे. त्याच्या अवतीभोलती सर्व टोमॅटो आहेत. या टोमॅटोमध्ये तो वेटोळे घालून बसलाय. इतकेच नाही तर किंग कोब्रा कोणालाही या टोमॅटोजवळ येऊ देत नाहीये. कोणीही टोमॅटोजवळ आलं तर किंग कोब्रा त्याच्यावर हल्ला करताना दिसतोय.

Cobra Protect Tomatoes
Tomato Prices : टाेमॅटाेच्या वाढत्या दरांना लागणार ब्रेक, किसान सभेचा 'या' निर्णयास विराेध (पाहा व्हिडिओ)

हिऱ्यासखी टोमॅटोला सुरक्षा

बॉलिवूड किंवा हॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये महागड्या वस्तूंसाठी सुरक्षा म्हणून वाघ, चित्ते किंवा मग अशा प्रकारे साप ठेवले जातता. यामुळे कोणतीही व्यक्ती या महागड्या वस्तू चोरण्याचे धाडस करू शकत नाही. आता अशीच सुरक्षा चक्क टोमॅटोलाही मिळाली आहे. टोमॅटोच्या सुरक्षेसाठी एका व्यक्तीने थेट किंग कोब्रा येथे आणून ठेवला आहे.

किंग कोब्राचे आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. टोमॅटो महाग झाल्याने त्यावर आतापर्यंत अनेक मिम्स व्हिडिओ व्हायरल झालेत. अशात आता टोमॅटोच्या सुरक्षेसाठी किंग कोब्राचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी यावर अनेक हास्यास्पद कमेंट केल्या आहेत.

Cobra Protect Tomatoes
Tomato Price Memes: नशीब असावं तर टोमॅटोसारखं...; लालबुंद टोमॅटोचे भन्नाट मीम्स Viral

@mirzamdarif1 या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. मोहम्मद आरीफ असं व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. मोहम्मद एक सर्प मित्र आहेत. त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सापचे रेस्कू करतानाच्या अनेक व्हिडिओ पोस्ट करण्यात आल्यात. अशात हा व्हिडिओ देखील सापला रेस्क्यू करतानाचा आहे. मात्र यावेळी किंग कोब्रा साप थेट टोमॅटोजवळ पोहचल्याने व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

साप टोमॅटोजवळ असल्याने तो आपल्या मालकाच्या टोमॅटोंचे रक्षण करत असल्याचं नेटकरी म्हणतायत. आतापर्यंत या व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूव्ज आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.