Interesting Fact: भारतातील या गावात चपला घालण्यास बंदीच; पाहुण्यांसाठी खास नियम

People Walk By Bare Foot In Village: सध्या उन्हाळ्यात तर चप्पल न घालता घराबाहेर पडण्याचा कोणी विचारही करु शकत नाही. जर उन्हाळ्यात चप्पल न घालता घराबाहेर पडले तर पायाला फोड येतील. परंतु भारतात असे एक गाव आहे जिथे कोणीही कधीच पायात चप्पल घालत नाही.
Interesting Fact
Interesting FactGoogle

सध्या घराबाहेर पडताना स्वतः ची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. घराबाहेर पडताना चांगले कपडे, शूज, स्किन केअर करुन निघावे. सध्या उन्हाळ्यात तर चप्पल न घालता घराबाहेर पडण्याचा कोणी विचारही करु शकत नाही. जर उन्हाळ्यात चप्पल न घालता घराबाहेर पडले तर पायाला फोड येतील. परंतु भारतात असे एक गाव आहे जिथे कोणीही कधीच पायात चप्पल घालत नाही.

भारतातील एका गावात लोक फक्त अनवाणी पायाने फिरतात. त्यांना चप्पल हा प्रकार माहितदेखील नाही. या गावाचे नाव वेमना इंदलू असे आहे. हे गाव तिरुपतीपासून ५० किलोमीटर अंतरावर वसले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावात एकूण २५ कुटूंब राबतात. जवळपास ७५ ते ८० लोक या गावात राहत असतील. या गावात अनवाणी फिरण्याची परंपरा आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या गावातील लोक चप्पल घालत नाही. त्याचसोबत कोणतीही व्यक्ती गावात प्रवेश करताना चप्पल काढते. आमदार, खासदार, जिल्हा दंडाधिकारी यांनादेखील गावाबाहेर चप्पल काढण्याचा नियम लागू आहे. या गावातील लोक जास्त प्रमाणात शेतीवर अवलंबून आहेत. या गावातील लोक पालवेकरी समाजाचे आहेत.

Interesting Fact
Auto Rickshaw Viral Video: बापाची वेडी माया! लेकीच्या वाढदिवशी फुग्यांनी सजवली संपूर्ण रिक्षा; VIDEO VIRAL

या गावात अनवाणी फिरण्याची परंपरा आहे. याचसोबत गावातील एकही व्यक्ती कधीच रुग्णालयात दात आहे. गावातील लोक देवदेवतांची पूजा करतात. देव त्यांचे संरक्षण करेल, असे त्यांचे म्हणणे आहे. या गावातील लोक आजारी पडले तर ते कडुलिंबाच्या झाडाला प्रदक्षिणा करतात. या झाडाची प्रदक्षिणा केल्यानंतर सर्व रोग बरे होतात, असा त्यांचा विश्वास आहे.

Interesting Fact
Auto Rickshaw Viral Video: बापाची वेडी माया! लेकीच्या वाढदिवशी फुग्यांनी सजवली संपूर्ण रिक्षा; VIDEO VIRAL

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com