Ashok Pawar: 'तू कसा आमदार होतो तेच बघतो', अजितदादांनी दिलं थेट चॅलेंज; अशोक पवारांचा पलटवार, नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar Vs Ashok Pawar: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांना पुन्हा आमदार कसा होतो हेच पााहतो, असे थेट आव्हान दिले होते. अजित पवारांच्या या आव्हानानंतर अशोक पवार यांनी सडेतोड प्रत्यूत्तर दिले आहे.
Ajit Pawar Vs Ashok Pawar:
Ajit Pawar Vs Ashok Pawar: Saamtv

पुणे|ता. १० मे २०२४

मी मी करणाऱ्यांना निवडणुकीत पाडलं असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिरुरचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांना पुन्हा आमदार कसा होतो हेच पााहतो, असे थेट आव्हान दिले होते. अजित पवारांच्या या आव्हानानंतर अशोक पवार यांनी सडेतोड प्रत्यूत्तर दिले आहे.

काय म्हणाले अशोक बापू पवार?

"कोणाला आमदार, खासदार करायचे हे जनता ठरवते. असे आव्हान देणं गैर आहे. जनता आणि शरद पवार माझा पुढचा प्रवास ठरवतील. मला आमदारकी, मंत्री पदाची हाव नाही, आमच्यासाठी निष्ठा महत्वाची आहे. राजकारणातल्या चांगल्या माणसाने फक्त त्रास आणि पाडायचीच भाषा वापरावी का? ही भाषा जनतेला मान्य नसते," असे प्रत्यूत्तर अशोक पवार यांनी दिले.

तसेच "पाठिंबा देत नाही म्हणुन असा त्रास द्यायचा का? मी कोणाला आव्हान देणार नाही पण येणारा काळ ठरवेल. लोकसभेची निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. काहीही अपेक्षा न ठेवता शरद पवारांसोबत आहे. राजकारणात अशी आव्हाने देणं चांगलं नाही आणि अजित पवारांच्या तोंडात हि वाक्य येऊ नये," असेही अशोक पवार यावेळी म्हणाले.

Ajit Pawar Vs Ashok Pawar:
Shantigiri Maharaj: राज्यातील ६ लोकसभा मतदारसंघांमध्ये वारं फिरणार; शांतिगिरी महाराजांचा पाठिंबा नेमका कुणाला? करणार जाहीर

त्याचबरोबर घोडगंगा कारखाना बंद पाडल्याचा आरोपही त्यांनी अजित पवार यांच्यावर केला. "घोडगंगा दिवळखोरीत नसताना कर्ज प्रक्रिया थांबवली. पिडिसीसी बँकेने कर्ज दिलं नाही. तुम्ही कर्जच द्यायला नकार दिला आज कर्जाशिवाय कारखाना कसा चालणार? घोडगंगाच बंद झाला असं म्हणण्यापेक्षा कोणी बंद पाडला हे पाहा," असे म्हणत समोर येऊन चर्चा करायची तयारी आहे असे आव्हानही अशोक पवारांनी अजित पवारांना दिले.

Ajit Pawar Vs Ashok Pawar:
Water Crisis : मृतसाठ्यातून होणार पाण्याचा उपसा; इमर्जन्सी पंप सुरू करण्याची तयारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com