Shantigiri Maharaj: राज्यातील ६ लोकसभा मतदारसंघांमध्ये वारं फिरणार; शांतिगिरी महाराजांचा पाठिंबा नेमका कुणाला? करणार जाहीर

Nashik Lok Sabha 2024: नाशिक सोडून शांतिगिरी महाराजांचा पाठिंबा नेमका कुणाला? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आज यासंदर्भात शांतिगिरी महाराज आणि भक्त परिवार निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
Shantigiri Maharaj
Shantigiri MaharajYandex

अभिजीत सोनवणे, साम टिव्ही नाशिक

राज्यात तीन टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता राज्यात सगळ्यांचं लक्ष चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदानाकडे लागलेलं आहे. नाशिक (Nashik) सोडून शांतिगिरी महाराजांचा पाठिंबा नेमका कुणाला? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आज यासंदर्भात शांतिगिरी महाराज आणि भक्त परिवार निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

नाशिक वगळता अन्य लोकसभा मतदारसंघात शांतिगिरी महाराजांचा पाठिंबा कुणाला? हे चित्र आता स्पष्ट होणार आहे. आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शांतिगिरी महाराज आणि भक्त परिवार निर्णय घेणार (Shantigiri Maharaj's Support) आहेत. मोठा भक्त परिवार असलेल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये कुणाच्या पारड्यात मतं टाकायची? हे आज शांतिगिरी महाराज ठरवणार आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांची आज पत्रकार परिषद पार पडणार आहे.

शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) सहा लोकसभा मतदारसंघातील भूमिका आज स्पष्ट करणार आहेत. दिंडोरी, संभाजीनगर, शिर्डी, धुळे, जळगाव आणि जालना या लोकसभा मतदारसंघांमध्ये जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या प्रमाणात आहे. नाशिकसह या सहा लोकसभा मतदार संघामध्ये आपले उमेदवार उभे राहणार असल्याचं शांतिगिरी महाराजांनी सांगितलं होतं. या मतदार संघामध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा काय भूमिका घ्यायची, याबाबत आज पत्रकार परिषदेतून निर्णय होणार आहे.

प्रामुख्यानं जळगाव, शिर्डी, छत्रपती संभाजीनगरसह अन्य काही लोकसभा मतदारसंघांबाबत निर्णय होणार आहे. राज्यातील १३ ते १४ जिल्ह्यात जय बाबाजी भक्त परिवार आहे. शांतिगिरी महाराज कुणाला पाठिंबा (Lok Sabha 2024) देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर नाशिकमधून स्वतः शांतिगिरी महाराज लोकसभा निवडणूक लढवत आहेत. नाशिकमध्ये आता चांगलीच राजकीय खेळी रंगली असल्याचं पाहायला मिळतंय.

Shantigiri Maharaj
Pune Lok Sabha 2024: प्रचाराचा शेवटचा टप्पा; आज पुण्यात सभांचा धडाखा; अजित पवार, सुप्रिया सुळे अन् देवेंद्र फडणवीस उमेदवारांच्या प्रचारार्थ मैदानात

नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसे मैदानात उतरली आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी मनसेचा नाशिकमध्ये निर्धार मेळावा होणार आहे. मनसे अध्यक्ष अमित ठाकरे नाशिक आणि दिंडोरीतील मनसे सैनिकांचा निर्धार मेळावा घेणार आहेत.

शनिवारी दुपारी १२ वाजता मनसेचा निर्धार मेळावा पार पडणार आहे. यावेळी महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी अमित ठाकरे मनसे सैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार देखील मनसेच्या निर्धार मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतेय.

Shantigiri Maharaj
Mumbai Lok Sabha: शिंदे गटाच्या सचिवाकडून अपक्ष उमेदवाराला पैशांची ऑफर! कथित Audio Clip मुळे एकच खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com