Water Crisis : मृतसाठ्यातून होणार पाण्याचा उपसा; इमर्जन्सी पंप सुरू करण्याची तयारी

Sambhajinagar news : उन्हाच्या तडाख्यामुळे सध्या जायकवाडी धरणातून दररोज १.१६ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. सद्यस्थितीत या धरणात केवळ ७.२७ टक्के इतकाच जलसाठा उपलब्ध
Jayakwadi Dam
Jayakwadi DamSaam tv
Published On

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठणच्या जायकवाडी धरणातील (Jayakwadi Dam) पाणीसाठा कमी झाला आहे. यामुळे आता धरणाच्या मृत साठ्यातून पाण्याचा उपसा करावा लागणार आहे. त्यासाठी इमर्जन्सी पंप कार्यान्वित करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. 

Jayakwadi Dam
Shiv Sena vs BJP : नरेंद्र मोदी ४ जूननंतर पंतप्रधान नसतील, ते झोला घेऊन हिमालयात जातील; शिवसेना ठाकरे गटाची टीका

उन्हाच्या तडाख्यामुळे सध्या जायकवाडी धरणातून दररोज १.१६ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. सद्यस्थितीत या धरणात केवळ ७.२७ टक्के इतकाच जलसाठा उपलब्ध असून येत्या काही दिवसातच तो संपणार आहे. (Sambhajinagar) पावसाळा लांबल्यास पाण्याची समस्या अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. आता देखील भीषण टंचाई जाणवत असल्याने धरणाच्या मृतसाठ्यातून (Water Scarcity) पाणी पुरवठा करावा लागणार आहे. 

Jayakwadi Dam
Buldhana Accident : भरधाव दुचाकी बसला धडकली; एकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

गेल्या वर्षी जायकवाडी धरणात ४८ टक्के जलसाठा होता. मात्र यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे पाण्याची पातळी कमी झाली आणि मृतसाठ्यातून पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. आता मृत पाणीसाठ्यातून उपसा करण्यासाठी इमर्जन्सी पंप सुरू करण्याची तयारी आहे. यासाठी साधारणतः १५ लाखापर्यंतचा खर्च केला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अशा पद्धतीने मागील ४९ वर्षात केवळ १२ वेळा धरणाच्या मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा करावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com