Buldhana Accident : भरधाव दुचाकी बसला धडकली; एकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

Buldhana News : बुलढाणा- मोताळा मार्गावर दोन मित्र दुचाकीने जात होते. यावेळी भरधाव वेगात असलेली मोटरसायकल नियंत्रित न झाल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला समोरून जोरदार धडक दिली
Buldhana Accident
Buldhana AccidentSaam tv

संजय जाधव 

बुलढाणा : विरुद्ध दिशेने येत असलेल्या बसवर दुचाकी समोरून धडकली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच (Death) मृत्यू झाला. तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात (Buldhana) बुलढाणा- मोताळा मार्गावर असलेल्या मूर्ती फाट्यानजीक घडला.

Buldhana Accident
Narendra Dabholkar: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा आज निकाल; मारेकऱ्यांना काय होणार शिक्षा?

बुलढाणा- मोताळा मार्गावर दोन मित्र दुचाकीने जात होते. यावेळी भरधाव वेगात असलेली मोटरसायकल नियंत्रित न झाल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण (Accident) अपघातात मोटरसायकलस्वार वैभव समाधान गणगे याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

Buldhana Accident
Raigad Accident: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, ८ जखमी

लग्नासाठी जात होते दोन्ही मित्र 

वैभव आणि त्याचा मित्र मोटार सायकलने (Malkapur) मलकापूरककडे एका लग्नानिमित्त जात होते. त्याच वेळी समोरून येणाऱ्या बसवर जाऊन आदळल्याने अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड हे अपघातस्थळी आले. त्यांनी जखमीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णाल्यात भरती केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com