Pandharpur News : काय सांगता! सहा किलो वजनाची नागिन चप्पल; पंढरपूरच्या चांगदेव दानवे यांचा अनोखा छंद

Nagin Chappal : दानवे यांना वजनाने जास्त असणाऱ्या विविध प्रकारच्या चप्पला वापरण्याचा छंद आहे. तब्बल १०० घुंगरू असलेली सात नागांचा फणा असलेली सहा किलो वजनाची एक चप्पल देखील त्यांच्याकडे आहे.
Pandharpur News
Pandharpur NewsSaam TV

Pandharpur News :

प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळा छंद असतो. काही व्यक्ती जुनी नाणी साठवतात तर काही तिकिटे साठवतात. अशात पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील चांगदेव दानवे यांना नागिन चप्पल वापरण्याचा अनोखा छंद आहे. दानवे यांच्याकडे तब्बल सहा किलो वजनाची नागिन चप्पल आहे.

Pandharpur News
Pandharpur : शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने महिला सरपंचांवर अपात्रतेची कारवाई, माढा तालुक्यात खळबळ

दानवे यांना वजनाने जास्त असणाऱ्या विविध प्रकारच्या चप्पला वापरण्याचा छंद आहे. तब्बल १०० घुंगरू असलेली सात नागांचा फणा असलेली सहा किलो वजनाची एक चप्पल देखील त्यांच्याकडे आहे. तर 25 हजारांची नागिन चप्पल चांगदेव दानवे वापरतात.

या चप्पलबरोबर त्यांच्याजवळ अनेक प्रकारच्या चप्पल जोड्या आहेत. 1972 सालापासून अशा चप्पल वापरण्याचा त्यांना छंद आहे. त्यांच्या वयाच्या 11व्या वर्षापासून दानवे ही नागिन चप्पल वापरतायत. त्याकाळी या चप्पल 15 रुपयाला मिळत होत्या.

तिच चप्पल आता 11 हजार ते 25 हजार रुपयांपर्यंत मिळते. अशी प्रतिक्रिया चांगदेव दानवे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या अनोख्या छंदाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका व्यक्तीचे नागिन श्युज व्हायरल झाले होते. नागाचा फना असलेली बुटं या व्यक्तीने परिधान केली होती.

Pandharpur News
Sandal Price : जगविख्यात व्यक्तीची 50 वर्षापूर्वीच्या साध्या सँडलला कोट्यवधींची बोली, किंमत ऐकून व्हाल थक्क!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com