शासकीय जागेवर अतिक्रमण करणे माढा (madha) तालुक्यातील फुटजवळगाव येथील महिला सरपंचाला चांगलेच महागात पडले आहे. अतिक्रमण केल्या प्रकरणी सोलापूरच्या जिल्हाधिकारी (solapur collector) यांनी सरपंच शोभा पवार यांना अपात्र ठरवले आहे. (Maharashtra News)
सरपंच शोभा पवार यांनी सरपंच पदाचा गैरवापर करून भीमा पाटबंधारे विभागाच्या शासकीय जागेत अतिक्रमण केले. तेथे त्यांनी पत्रा शेड उभारले. सरंपच पवार यांच्या या विराेधात सामाजिक कार्यकर्ते अमर पवार यांनी साेलापूर जिल्हा प्रशासनास तक्रार केली.
साेलापूर जिल्हाधिकारी यांनी या तक्रारीची दखल घेतली. जिल्हाधिकारी यांनी तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये सरपंच शोभा पवार यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाधिकारी यांनी सरपंच शाेभा पवार यांचे सरपंच पद रद्द केले आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अमर पवार यांनी दिली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.