
Indian Man Tiger Selfie Attack: थायलंडमधील एका लोकप्रिय पर्यटनस्थळ फुकेत येथील 'टायगर किंगडममध्ये' एक धक्कादायक घटना घडलेली आहे. जिथे एका भारतीय पर्यटकावर वाघाने अचानक झडप घालून हल्ला केला. सर्व थरारक घटना कॅमेरात कैद झाली असून सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.
थायलंडमधील ही घटना घडली तेव्हा संबंधित भारतीय पर्यटक वाघ असलेल्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी गेला होता. पर्यटक (Tourist) जेव्हा तिथे गेला त्याच्या सोबत जे वाघाची देखभाल करतात तो व्यक्तीही होता. त्यानंतर वाघाच्या अगदी जवळ जाऊन पर्यटक फोटो काढण्यासाठी जातो. पण वाघाने अचानक पर्यटकावर हल्ला केला. ज्या पर्यटकाच्या अंगावर वाघाने हल्ला केला, त्याच्या किंकाळ्या ऐकून तुमचाही थरकाप उडेल.
टायगर किंगडमधील हा व्हिडिओ सध्या एक्सवरील ''Sidharth Shukla'' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. ऐवढेच नाही तर सर्व घटना इन्स्टाग्रा, फेसबूक अशा अनेक प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर देखील करण्यात येत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज मिळालेले असून हजारो लाईक्स देखील मिळत आहेत.
सध्या हा व्हिडिओ(Shocking Video) जगभर नेटकऱ्यांनी पाहिला असून त्यावर विविध प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने म्हटलं की,''प्राण्यांशी असी मस्ती केली तर अंगलट नक्की येणार'' दुसऱ्या यूजरने म्हटलं,''खुपच भयानक घटना आहे'' तिसऱ्या यूजरने म्हटलं,''यानंतर प्रत्येकजण वाघाच्या जराही जवळ जाणार नाही'' अशा अनेक हैराणजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.