Viral Video: लग्नाच्या मांडवात हायव्होल्टेज ड्रामा! ऐन मुहूर्तावर प्रेयसीची एन्ट्री; थेट मंडपात पोलिसांसह पोहोचली

Wedding Viral Video: सोशल मीडियावर लग्नकार्यातील अनेक व्हिडिओ तुम्हाला दिसतील. पण सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून अक्षरशा: तुम्हीही डोक्याला हात माराल. नक्की काय घडले व्हिडिओत तुम्ही पाहा.
Wedding Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Ex-Girlfriend Crashes Wedding: सोशल मीडियावर सध्या एका लग्नातील व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका लग्नासोहळ्यात असा काही हायव्होल्टेज ड्रामा झाला की,वऱ्हाडी मंडळी थक्क झाले. लग्नाच्या मांडवात सगळं सुरळीत सुरू असतानाच अचानक वराची जुनी प्रेयसी पोलिसांसह तिथे हजर झाली

नेमके घडले तरी काय?

व्हायरल(VIRAL) होत असलेली ही घटना ओडिशातील भुवनेश्वर येथील आहे. जिथे लग्न सुरु असताना मध्येच नवरदेवाची जुनी प्रेयसी पोलिसांसह तिथे आली. प्रेयसीचा आरोप होता की, नवरदेवाने तिला लग्नाचं वचन दिलं मात्र तिला त्यानंतर धोका दिला. हे ऐकून मंडपात मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर लग्नाच्या मांडवात धक्काबुक्की आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केल्याने सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ अपलोड होताच काही तासांतच त्याला हजारो लाईक्स आणि लाखोंचे व्ह्यूज मिळालेले आहेत. सोशल मीडियावर यापूर्वीही लग्नातील अशा अनेक घटनांचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

व्हिडिओ(VIDEO) पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक मजेशीर तर काही संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''देशात काही तर सुरु आहे आणि इकडे काय सुरु आहे'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''चालू दे असंच'' तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''जबरदस्त अजून मारा एकमेंकाना'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Wedding Viral Video
Dance Viral Video: गोविंदाच्या गाण्यावर नवविवाहित जोडप्याचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com