
Jagannath Rath Yatra Elephant Chaos: गुजरातमधील अहमदाबाद शहरात दरवर्षी आयोजित होणारी श्री जगन्नाथ रथयात्रा ही अत्यंत भव्य आणि श्रद्धेने पार पडणारी धार्मिक प्रक्रिया आहे. पण, यंदाची रथयात्रा एका थरारक आणि चिंताजनक घटनेमुळे चर्चेचा विषय बनली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक रथ ओढण्यासाठी जमले होते, पण अचानक तीन हत्ती नियंत्रणाबाहेर गेले आणि संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला.
ही घटना सकाळच्या सुमारास घडली, जेव्हा रथयात्रेचा मुख्य रथ(Jagannath Rath Yatra) पुढे सरकत होता. हत्तींची मिरवणूक पार पडत असताना अचानक तीन हत्ती बेकाबू झाले. त्यांच्या हालचाली अनियंत्रित झाल्या आणि त्यांनी आजूबाजूच्या गर्दीकडे धाव घेतली. हत्तींचा वेग, त्यांचे भव्य शरीर आणि गोंधळामुळे भाविकांमध्ये घबराट निर्माण झाली. काही लोकांनी धावत सुटका घेतली, तर काहीजण जवळच्या इमारतींमध्ये आश्रय घेण्यासाठी धावले.
घटनेनंतर लगेचच पोलिस यंत्रणा आणि स्थानिक स्वयंसेवकांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रशिक्षित हत्तींचे रक्षक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हत्ती शांत करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. काही वेळानंतर हत्तींच्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले, मात्र तोपर्यंत परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
या घटनेमुळे अनेक भाविकांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसून येत होती. एका भाविकाने सांगितले की,"आम्ही नेहमीप्रमाणे दर्शनासाठी आलो होतो. हत्तींची धावपळ बघून क्षणभर जीव खालीवर झाला'',तर काहींनी या क्षणाचा व्हिडिओ(Video) मोबाईलमध्ये कैद केला, जो नंतर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.