भरधाव कारने स्कुटीला उडवलं, दोघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल

Telangana Accident Viral Video: सोशल मीडियावर वारंवार अनेक थरकापजनक घटना व्हायरल होत असतात. सध्याही असाच एक भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कैद झाली आहे.
Telangana Accident Viral Video
CCTV footage captures the moment a speeding car crashes into a scooter in Telangana's Moinabad, killing two people instantly. Saam Tv
Published On

Telangana Accident: तेलंगणा शहरात पुन्हा एकदा रस्त्यावर रक्ताचा सडा पडला आहे. एका भरधाव कारने स्कूटीला जबरदस्त धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही भीषण घटना रस्त्यालगतच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना बुधवारील दुपारच्या सुमारास घडली असल्याचे समजत आहे. स्कूटीवरून दोन तरुण प्रवास करत होते. दरम्यान, समोरुन येणाऱ्या एका भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने स्कूटीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की स्कूटीचा चक्काचूर झाला आणि दोन्ही युवक दूर फेकले गेले. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं की, रस्त्यावरुन स्कुटी जात असते. दरम्यान त्याच रस्त्यावर समोरुन भरधाव वेगात कार येते आणि स्कुटीला उडवते. कारची धडक इतकी जोरदार असते की कारच्या धडकेत स्कुटी हवेत उडते. अपघात घडल्यानंतर काही क्षणांतच आजूबाजूचे लोक धावत आले. अपघात इतका भीषण होता की काही काळासाठी संपूर्ण परिसरात एकच घबराट पसरली होती.

या अपघातानंतर पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून संबंधित सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. पोलिसांकडून परिसरातील इतर कॅमेऱ्यांचाही तपास घेतला जात आहे, जेणेकरून कारचा नंबर आणि चालकाची ओळख पटवता येईल.

हा अपघात(Accident) आणखी एकदा शहरातील रस्त्यांवरील वेगाची भीतीदायक स्थिती उघड करून दाखवतो. वाहतूक नियमांचे उल्लंघन, वेगावर नियंत्रण नसणे आणि निष्काळजी वाहन चालवणे यामुळे असे अपघात वारंवार घडत आहेत. स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर गतिरोधक लावण्याची मागणी केली आहे. तसेच, अशा अपघातांना रोखण्यासाठी पोलिसांनी अधिक कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Telangana Accident Viral Video
पाठीमागून आलेल्या एसटी बसची धडक; ६५ वर्षीय महिला जागीच ठार, घटना CCTVमध्ये कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com