
Noida Shockig News: ग्रेटर नोएडामध्ये पुन्हा एकदा पाळीव कुत्र्यावरुन झालेला धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.ज्यात एका महिलेने पाळीव कुत्र्यावरुन एका चिमुकल्याला मारहाण केलेली आहे.घडलेल्या संपूर्ण घटनेता खरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे.
ग्रेटर नोएडामधील एका सोसाटीमध्ये ही घटना घडली आहे.ज्यात लिफ्टमध्ये असलेल्या एका ८ वर्षाच्या मुलाने कुत्र्याला घाबरुन त्या महिलेला तुमचा पाळीव कुत्रा(Dog) लिफ्टमधअये आणू नका अशी विनंती केली,मात्र त्या महिलेने संतापून त्या चिमुकल्याला अक्षरशा:घेचून लिफ्टच्या दरवाजातून बाहेर आणले आणि त्याला मारहाणही केली.संपूर्ण घडलेला हा प्रसंग तुम्हाला व्हायरल सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आलेला आहे. एक्सच्या @rishibagree या अकाउंटवरील व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,''नोएडामध्ये एक महिला कुत्र्यासह लिफ्टमध्ये प्रवेश करते. कुत्र्याला पाहून मूल घाबरते. ती महिला मुलाला लिफ्टमधून बाहेर काढते आणि त्याला मारते'',असे लिहिले आहे.सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर लोकांनी मोठ्या संख्येने प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''सर्वांनी मिळून अशा महिलेला चांगलेच हाणायला पाहिजे'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''अटक करा '' तर अशा अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप: धक्कादायक हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.