Girl Dance Viral Video: गोरी गोरी, नवरी मांडवाखाली... मैत्रिणीच्या फर्माइशवर तरूणी बेभान नाचली; नुसता राडा आणि धुरळा

Dance Viral Video: लग्नकार्य किंवा सणासुदीचा काळ असो सर्वत्र एक आनंदाचं वातावरण असतं. कोणताही सोहळाहा एक गोष्ट झाल्याशिवाय पूर्ण होत नाही.
Girl Dance Viral Video
Girl Dance Viral Videosaam digital
Published On

Girl Dance Viral Video

लग्नकार्य किंवा सणासुदीचा काळ असो सर्वत्र आनंदाचं वातावरण असतं. आनंद व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. काही व्यक्तींना जास्त आनंद झाल्यास रडू देखील कोसळतं. तर काही जण जोरजोरात हसू किंवा नाचू लागतात. हळद म्हटलं की, डीजेच्या तालावर अनेक जण धिंगाणा घालतात. अशात सोशल मीडियावर एका तरुणीचा बेभान होऊन नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Girl Dance Viral Video
Girl Dance Viral Video: दिलबर दिलबर.....वाडीतल्या लोकांच्या फर्माइशवर तरूणी बेभान नाचली, नुसता राडा आणि धुरळा...

डिजेचा आवाज येताच लहानांपासून मोठ्यापर्यंत कोणालाच डान्स करण्याचा मोह आवरता येत नाही. मग अगदी लहान असो किंवा वयोरुद्ध बेभान होऊन डान्स करायला लागतो. लग्न म्हटल्यावर तरुण मुलांना आणि मुलींना लग्नासाठी मागणी देखील येतात. घरातल्याच बहिणीच्या किंवा भावाच्या लग्नात मजामस्ती करताना मागणं आल्याचा अनुभव तुम्हालाही आलाच असेल.

अशा टॉक्सीक वातावरणातून आणि नको असलेल्या मागण्यांपासून मुलींना सुटका करताकरता नाकी नऊ येतात. घरातलं लग्न असलं की आई मुलीला हमखास साडी नेसायला सांगते. त्यामुळे अनेक मागणी येतात. आता आलेल्या मागण्यांपासून सुटका करण्यासाठी या तरुणीने भन्नाट आयडीया शोधलीये.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तु्म्ही पाहू शकता की, यात एका कार्यक्रमात ही तरुणी डान्स करत आहे. पिवळ्या रंगाची साडी आणि हिरव्या रंगाचा ब्लाऊज परिधाण केलेल्या या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तरुणीने आलेली मागणी पळवून लावण्यासाठी साधं सुधं आणि लाजरंलुजरं न राहता सगळ्या पाहुण्यांसमोर धमाकेदार डान्स केलाय.

तिने ' गोरी गोरी, नवरी मांडवा खाली ' या गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावलेत. तरुणीने जबरदस्त डान्स करत त्या क्षणाचा मनसोक्त आनंद घेतला आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे समजू शकले नाही. व्हायरल व्हिडिओ तिच्याजवळ उपस्थित असलेल्या व्यक्तिने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.

सदर व्हिडिओ @komalbodkhe_या इन्स्टांग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या कमेंटचा वर्षाव होत आहे. तसेच या व्हिडिओवर गंमतीदार प्रतिक्रिया आल्या आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की,'नाचून घे नंतर सासूच्या तालावर नाचायचय..अगदी असंच full swagमध्ये' तर आणखी एका यूजरने लिहिलं आहे की, झिंगाट पेक्षा खतरनाक डान्स' तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Girl Dance Viral Video
Girls Dance Video: माझं लगीन ठरलं...नाचा! लग्न ठरल्याच्या आनंदाने तरुणी भारावून गेली; डान्सचा जबरदस्त video व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com