Shocking Video: उल्हासनगरमध्ये टोळक्याचा रिक्षाचालकावर चॉपरने हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

Shocking Attack Video: उल्हासनगरमधून एक अंगाचा थरकाप उडवणारी घटना सध्या व्हायरल होत असून त्या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. ज्यात टोळक्याकडून रिक्षाचालकावर चॉपरने हल्ला करण्यात आलेला आहे.
Shocking Attack Vide
Ulhasnagar CrimeSaam Tv
Published On

Ulhasnagar Shocking Video: उल्हासनगरच्या आशेळे पाडा भागात शनिवारी सायंकाळी रिक्षा चालकावर टोळक्याने चॉपरने हल्ला केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, विठ्ठलवाडी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

आशेळे पाडा गणपती मंदिर चौकात रिक्षा स्टॅण्ड असून याठिकाणी अरुंद रस्ता असल्याने वाहतूक कोंडी होत असते. शनिवारी सायंकाळी एका दुचाकीवरून एक टोळकं ट्रिपल सीट जात असताना वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी रिक्षा बाजूला घेण्यावरून रिक्षा चालक आणि या टोळक्यात वाद (Argument)झाला.

त्यातून रिक्षा चालकाने यातील एका तरुणाच्या कानशिलात लगावली. त्यावर या टोळक्याने रिक्षा चालकावर चॉपरने हल्ला चढवला. त्यामुळं रिक्षाचालक हा जीव वाचवण्यासाठी पळाला, मात्र पाठलाग करून या टोळक्यानं त्याच्यावर हल्ला केला. यात जखमी झालेल्या रिक्षा चालकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपी अरमान खान आणि करण मेहरा या दोघांना अटक केलीये. त्यांच्याकडून हल्ल्यात वापरलेलं हत्यार जप्त करण्यात आलं असून विठ्ठलवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

या घटनेचा व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या घटनेने संपूर्ण उल्हानगरमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ​उल्हासनगर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. मात्र, अलीकडील काही गुन्हेगारी घटनांमुळे वारंवार चर्चेत येत आहे. या घटनेमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून या घटनेमुळे विविध प्रतिक्रिया संपूर्ण राज्यभरातून आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

Shocking Attack Vide
Ulhasnagar Crime: ज्वेलर्समध्ये चोरी, अंगठीची अदलाबदली; नकली अंगठी  ठेवून सोन्याची खरी अंगठी पळवली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com